Gunjwani Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Gunjwani Irrigation Project : जुन्या सर्वेप्रमाणे गुंजवणीच्या जलवाहिनीचे काम करा

Water Line : याबाबत सोमवारी (ता. १९) पुणे येथील सिंचन भवन येथे जलसंपदाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार संजय जगताप यांनी मागणी केली.

Team Agrowon

Pune News : तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या गुंजवणी जलसिंचन योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीचे काम १९९३ च्या जुन्या सर्वेप्रमाणे करण्याची मागणी सोळा गावांतील शेतकऱ्यांची असून त्याप्रमाणे काम करण्यात यावे, अशी मागणी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केली आहे.

याबाबत सोमवारी (ता. १९) पुणे येथील सिंचन भवन येथे जलसंपदाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार संजय जगताप यांनी मागणी केली. सध्या मांडकी, पिसुर्टी आदी बागायती गावांतील क्षेत्रामधून होणारे जलवाहिनीचे काम न होता ते राख, वाल्हा, वाल्ह्याच्या सर्व वाड्या, हरणी, परिंचे, माहूर आदी १६ गावांतून १९९३ मध्ये झालेल्या जुन्या सर्वेप्रमाणे बंदिस्त जलवाहिनीचे काम करणे आवश्यक असून १९९३ च्या सर्वेक्षणामध्ये ओलिताखाली आरक्षित केलेले सर्व क्षेत्र ओलिताखाली आले पाहिजे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.

या वेळी मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी, शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जलवाहिनीचे काम जुन्या सर्वेप्रमाणे होईल. त्यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता करून सिलिंग झालेल्या सर्व क्षेत्राला लाभ देऊ. ४ सप्टेंबर रोजी याबाबत पुन्हा होणाऱ्या बैठकीत आराखडा सादर करू, असेही गुणाले यांनी सांगितले.

बैठकीला माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, हेमंतकुमार माहूरकर, पंचायत समितीचे माजी सभापती गिरीश पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अभिजित जगताप, आप पक्षाचे नेते दत्तात्रय कड, हनुमंत पवार, महेंद्र माने, परिंचे गावचे बाळासाहेब जाधव, नीलेश जाधव, अनिल जाधव यांसह गुंजवणी योजनेच्या लाभार्थी गावांतील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT