Sheep Wool  Agrowon
ॲग्रो विशेष

Sheep's Wool : लोकरीला मिळतोय नवा साज

Diwali Article 2024 : तुम्हाला मानदुखी, पाठदुखी, स्पाँडेलेसिसचा त्रास आहे, तर यापुढे घोंगडी किंवा जेनवर झोपा... असा सल्ला तज्ज्ञांकडून मिळतोय. कारण मेंढीची लोकर ही आरोग्यदायी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्यासाठी घोंगडीचा आधार घ्यावा लागतोय.

Team Agrowon

अमित गद्रे

Health Benefits : डोंगर, माळरानावर चरणारे मेंढ्यांचे कळप, शेतात बसवलेला मेंढ्यांचा आखर हे ग्रामीण भागातील चित्र. काही घरात गेलात की घोंगडी, जेन दिसते. परंतु जसा काळ बदलला त्या पद्धतीने ग्राहकांची मागणी बदलली. त्याचा मेंढीपालन आणि लोकर विणकामावर परिणाम झाला. पारंपरिक मेंढीपालन हा राज्यातील ग्रामीण अर्थकारणातील व्यवसाय. काळाच्या गरजेनुसार हा व्यवसाय देखील कात टाकतोय.

पारंपरिक मेंढीपालनाला नवी दिशा देण्यासाठी तसेच लोकरीच्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. काही प्रयोगशील युवा उद्योजक लोकरीच्या उत्पादनांकडे वळू लागलेत. कारण या नैसर्गिक धाग्यामध्ये जागतिक बाजारपेठ मिळवण्याची ताकद आहे.

राज्यातील मेंढीपालन व्यवसायाबाबत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे सहायक संचालक डॉ. सचिन टेकाडे म्हणाले, ‘‘परंपरेने दख्खनी, संगमनेरी आणि माडग्याळ मेंढ्यांचे संगोपन केले जाते. राज्यातील मांस उत्पादनामध्ये मेंढ्यांच्या मांसाचा वाटा हा ३.२७ टक्के आहे. परंपरेने मेंढीपालन हा ग्रामीण भागातील व्यवसाय. यामध्ये सुधारणा आणि संशोधनाच्या दृष्टीने स्वातंत्र्यपूर्व काळापासून विविध टप्प्यांत प्रयत्न सुरू झाले.

पुणे शहरातील गोखले नगर परिसरात मेंढी फार्म कार्यरत आहे. ब्रिटिशकालीन पशुतज्ज्ञांनी संशोधन तसेच राज्यातील मेंढ्यांच्या लोकरीची गुणवत्ता सुधारण्यासाठी १९३५ च्या सुमारास मेंढी फार्म सुरू केला. या ठिकाणी मेंढीच्या विविध जातींचे संवर्धन केले जायचे. महाराष्ट्रातील मेंढ्यांची लोकर भरड असल्याने वस्त्रनिर्मितीसाठी ही लोकर अडचणीची ठरत होती. इंग्रजांनी त्या काळी परदेशातून रॅमबूलेट, डोर्सेट यांसारख्या तलम लोकर देणाऱ्या मेंढ्या आणल्या.

या मेंढ्यांपासून जास्त प्रमाणात लोकरीचे उत्पादन मिळते. तसेच ही लोकर फाइन प्रकारातील उच्च गुणवत्तेची होती. त्यानंतर साधारणपणे १९५१ च्या सुमारास ‘लोकर धागा ते वस्त्र’ या संकल्पनेतून मेंढी फार्ममध्ये लोकर तपासणीसाठी प्रयोगशाळेसह लोकर प्रक्रिया केंद्राची सुरुवात झाली. या माध्यमातून लोकरीची पारंपरिक उत्पादने तयार होऊ लागली.’’

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Flood : पूरबाधित ४० गावांतील नुकसानग्रस्त घरांच्या तातडीने याद्या तयार करा

Pomegranate Crop Damage : सांगली जिल्ह्यात डाळिंबाचे नुकसान

Seena River Flood : पूरग्रस्त गावातील पशुधनाला चारा वाटप

Girna Dam : गिरणा धरणात पाण्याची आवक

Bajari Crop : बाजरी पक्वतेच्या मार्गावर; पीकही जोमात

SCROLL FOR NEXT