Wool Processing Industry : लोकर प्रक्रिया उद्योग ढवळपुरीलाच होणार

Sheep Farming : जिल्ह्यातील करंदी (ता. पारनेर) येथे लोकर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासनाने जमीन दिली होती.
Sheep
Sheep Agrowon

Nagar News : ः जिल्ह्यातील करंदी (ता. पारनेर) येथे लोकर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासनाने जमीन दिली होती. मात्र मेंढपाळांची संख्या अधिक असलेल्या ढवळपुरी (ता. पारनेर) येथे हे केंद्र न झाल्याने लोकांची नाराजी निर्माण झाली.

त्यामुळे निर्णय बदलून अखेर हे केंद्र ढवळपुरी येथेच होणार असल्याचे स्पष्ट करावे लागले आहे. शुक्रवारी (ता. १५) शासनाने काढलेल्या आदेशानुसार ढवळपुरी येथे लोकर प्रक्रिया उद्योगाला सव्वाचार एकर जमीन दिली आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने अध्यादेश काढला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ढवळपुरीत मेंढपाळांची संख्या अधिक व मागणीचा विचार करून ढवळपुरी येथेच हे केंद्र करणे गरजेचे असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिला व विभागीय आयुक्तांकडून सव्वाचार एकर जमीन या केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Sheep
Wool Processing : ढवळपुरीचे लोकर प्रक्रिया केंद्र हलविले करंदीला

राज्यात मेंढ्यांची संख्या ३० लाखांवर असून दरवर्षी अंदाजे ९ हजार ८०० टन लोकरीचे उत्पादन होते. देशाच्या अवर्षणप्रवण, अर्धअवर्षण प्रवण, डोंगराळ भागात उपजीविकेसाठी मेंढ्यांची मोठी मदत होते. मेंढ्यांना लोकर ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. लोकर हे नैसर्गिक फायबर आहे. लोकरीत थर्मल रेग्युलेशन, फ्लेम रेझिटेन्स, ध्वनिशास्त्र असे वेगवेगळे गुणधर्म आहेत.

Sheep
Madgyal Sheep : माडग्याळ मेंढीची नोंद कधी घेणार?

नगर जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे सुमारे ३ लाख इतक्या मेंढ्यांची संख्या आहे. त्यातील सर्वाधिक संख्या पारनेर तालुक्यात आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ढवळपुरी येथे हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान महिनाभरापूर्वी हा उद्योग करंदी येथे होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मेंढपाळ व शेळी-मेंढीपालकांत नाराजी निर्माण झाली. त्यामुळे पुन्हा हा लोकर प्रक्रिया उद्योग ढवळपुरी येथेच होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

घोंगडी, ‘जाण’साठी प्रसिद्ध

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी, वनकुटे, पळशी, धोत्रे भागात मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मेंढीच्या लोकरीपासून हातमागावर घोंगडी, जाण तयार करण्यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात येथील घोंगडी, जाणची विक्री होत असल्याचे येथील सुखदेव चितळकर यांनी सांगितले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com