Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis: हंडाभर पाण्यासाठीची वणवण थांबणार कधी ?

Junnar Water Problem: जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे खोऱ्यातील पाण्याचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आठ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागात महिलांची हंडाभर पाण्यासाठी सुरू असलेली वणवण थांबवण्यासाठी एमआय टॅंक हा एकमेव पर्याय असल्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

Team Agrowon

Junnar News: कोपरे मांडवे खोऱ्यात (ता. जुन्नर) दर वर्षीप्रमाणे पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा काही वस्त्यांवर सुरू झाला आहे. या भागातील महिलांची हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली वणवण थांबणार तरी कधी, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील अतिदुर्गम आदिवासी भागातील कोपरे जांभूळशी, मांडवे, मुथाळणे, माळ्याचीवाडी, काठेवाडी, मुठेवाडी, बांगरवाडी, डामसेवाडी, कुडाळवाडी या गावांतील आदिवासी महिला, लहान मुले, वयोवृद्धांचा वर्षांनुवर्षे पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष पाहायला मिळत आहे. या भागातील महिला दिवसभर शेतमजुरी करतात, सायंकाळी घरी गेल्यावर त्यांना पाणी आणण्यासाठी हंडा घेऊन भटकंती करावी लागते.

याच गावामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन योजनेअंतर्गत ‘हर घर जल, हर घर नल’ पाण्यासाठी जलवाहिनी टाकल्या गेल्या आहेत. मात्र आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या प्रमाणे नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार, असा प्रश्न आहे. प्रशासनाकडून योजना राबविण्याचा कागदोपत्री केविलवाणी प्रयत्न जोरदार सुरू आहे.

पावसाळ्यामध्ये या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, परंतु पाणी अडवण्यासाठी कुठलेही धरण नाही तसेच प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार, राजकीय उदासीनता, लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक केलेला काणाडोळा या कारणांमुळे उन्हाळ्यामध्ये मांडवी नदी कोरडीठाक पडलेली पाहायला मिळते.

कोपरे, मांडवे, मुथाळणे, जाभूळशी ही चार गावे व त्यांच्या वाड्या-वस्त्या मिळून जवळपास आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असून, या ग्रामस्थांची एमआय टॅंक व्हावा, ही प्रमुख मागणी आहे. टॅंक झाला तर या भागातील वर्षांनुवर्षे असलेली पाण्याची वणवण थांबेल. आणि या गावांमध्ये हरितक्रांती होऊन या भागाचा विकास होईल तसेच रोजगार मोलमजुरीसाठी होणारी नागरिकांची भटकंती थांबेल, असे येथील ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : एक ऑगस्टपासून पीककर्ज प्रक्रिया ऑनलाइन

Ujani Dam Water Discharge : उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढवला

Maize Sowing : देशात मका लागवड १५ टक्क्यांनी वाढली

Dragon Fruit Rate : पहिल्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची विक्री अंतिम टप्प्यात

Heavy Rainfall Maharashtra : मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT