Satara Water Scarcity : साताऱ्यातील टंचाई निवारण्यासाठी १४.६१ कोटींचा आराखडा

Water Crisis : या वर्षी सर्वच तालुक्यांत पाणीटंचाईची समस्या कमी प्रमाणात आहेत. सध्या केवळ माण तालुक्यात ३२ टॅंकरने ३१ गावे आणि २१८ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.
Water Tanker
Water Tanker Agrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यात आगामी तीन महिने जाणवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये दहा तालुक्यांतील ४७३ गावे ६५७ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

त्यानुसार टॅंकर सुरू करणे, विहीर अधिग्रहणसह इतर कामांसाठी तब्बल १४ कोटी ६१ लाख ९० हजारांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये सर्वाधिक माण तालुक्याला ८.६० कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

Water Tanker
Water Scarcity : जलसाठा घटला; अनेक नद्या कोरड्या

या वर्षी सर्वच तालुक्यांत पाणीटंचाईची समस्या कमी प्रमाणात आहेत. सध्या केवळ माण तालुक्यात ३२ टॅंकरने ३१ गावे आणि २१८ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ४६ हजार ८८७ लोकसंख्या बाधित आहे. आठ विहिरी व सहा बोअरवेल प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या आहेत.

Water Tanker
Water Scarcity : सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ

आगामी काळात एप्रिल ते जून या कालावधीत संभाव्य पाणीटंचाई जाणवणाऱ्या आणि टॅंकरची मागणी केलेल्या गावांसाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये दहा तालुक्यातील ४७३ गावे, ६५७ वाड्यांचा समावेश आहे. त्यासाठी ४०० टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार आहेत. २०० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे.

तालुकानिहाय संभाव्य टंचाई निवारणासाठी निधी...

त्यासाठी तालुकानिहाय संभाव्य टंचाई निवारणासाठी १४ कोटी ६१ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये माण ८.६० कोटी, खटाव ३४.२० लाख, कोरेगाव २.०७ कोटी, खंडाळा ७.०२ लाख, फलटण ८६.५७ लाख, वाई : ६५.१५ लाख, पाटण १.२० कोटी, जावळी ३६.३३ लाख, महाबळेश्‍वर २९.४४ लाख, कऱ्हाड १४.५८ लाख निधीचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com