Shaktipeeth Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात महिलांनी अडवला रस्ता

Farmers Against Expressway: शक्तिपीठ महामार्ग विरोधात मालेगाव (ता. अर्धापूर) येथे मंगळवारी (ता. १) बाधित शेतकऱ्यांनी मुला-बाळांसह राष्ट्रीय महामार्गावर ठिया देत दोन तासांपेक्षा जास्त महामार्ग रोखला.

Team Agrowon

Nanded News: शक्तिपीठ महामार्ग विरोधात मालेगाव (ता. अर्धापूर) येथे मंगळवारी (ता. १) बाधित शेतकऱ्यांनी मुला-बाळांसह राष्ट्रीय महामार्गावर ठिया देत दोन तासांपेक्षा जास्त महामार्ग रोखला. विविध पक्षांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी या वेळी बाधित शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत माघार घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे अश्‍वस्त केल्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

शक्तिपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. १) एकाच दिवशी रास्ता रोको करण्याचा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार नांदेड जिल्ह्यामधील मालेगाव मंगळवारी रस्ता रोको आंदोलन येथे झाले. या वेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अर्जुन आडे, कामगार नेते कॉम्रेड प्रदीप नागापूरकर,

राष्ट्रवादी शप पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, राजू शेट्टीप्रणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजगोरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे विठ्ठल देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर, काँग्रेस पक्षाचे भोकर मतदारसंघ प्रतिनिधी तिरुपती पाटील कोंडेकर, शिवसेना उबाठा गटाचे नागोराव पाटील इंगोले, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले आदींनी ‘रास्ता रोको’मध्ये सहभागी होते.

शक्तिपीठ महामार्ग विरोधात बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सरकारने हा महामार्ग कायमचा रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. शक्तिपीठ महामार्गाला १४ महिने विरोध करूनही सरकार दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला असल्याची प्रचिती आजच्या आंदोलनात दिसून आली. ५०० पेक्षा जास्त बाधित कुटुंबे मुला-बाळांसह रस्त्यावर उतरल्यामुळे आंदोलनाची धार वाढली.

आता आरपारच्या लढाईसाठी शेतकरी सज्ज झाल्याचे संकेत आहेत. सरकारने कायदेशीर तरतुदीचे पालन न करता जबरदस्तीने पोलिस बंदोबस्तात मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास मुलाबाळांसह शेतात उतरून सरकारचा प्रयत्न उधळून लावण्याचे बाधित कुटुंबीयांनी निश्चित केले आहे. या वेळी कुटुंबातील महिला व बालकांनीही आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

या आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव इंगोले शेतकरी संघटनेचे हरिभाऊ कदम, किशनराव कदम, शंकरराव राजेगोरे, मारोतराव भांगे, मधुकरराव राजेगोरे विविध शेतकरी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची समन्वयक सुभाष मोरलवार, सतीश कुलकर्णी, गजानन तीमेवार, प्रमोद इंगोले मारुती सोमवारे, कचरू मुधळ, शहानंद मुधळ, दिलीप भिसे, बालाजी इंगोले, भाऊराव इंगोले, देवानंद इंगोले, प्रदीप इंगोले, एकनाथ पाटील, तनय इंगोले यांच्यासह मालेगाव, धामदरी, देगाव कु., भोगाव, उमरी येथील बाधित शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Policy: राज्यातील मत्स्यखाद्य बंधनकारक : नीतेश राणे

Dhananjay Munde Corruption Case: धनंजय मुंडे यांना ‘क्लीन चीट’ नाही : दमानिया

MAGNET Project: ‘मॅग्नेट’च्या २१०० कोटींच्या मान्यतेसाठी केंद्राला प्रस्ताव

Cotton Shortage: कापूसगाठींचे उत्पादन खानदेशात घटले

State Cooperative Bank: राज्य सहकारी बँकेचे सोसायट्यांना पाठबळ

SCROLL FOR NEXT