Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Procurement: ‘नाफेड’,‘एनसीसीएफ’ कांदा खरेदीत पारदर्शकता येणार का?

Nafed, NCCF, Transparency: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘बफर स्टॉक’साठी कांदा खरेदीचे नियोजन असूनही पारदर्शकता आणि वेळेवर खरेदीत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. शेतकरी संघटना आणि खासदारांनी भ्रष्टाचाराचा निषेध करत पारदर्शक खरेदीची मागणी केली आहे.

मुकुंद पिंगळे

Nashik News: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘बफर स्टॉक’साठी यंदा ३ लाख टन कांदा खरेदी प्रस्तावित आहे. मात्र मे महिना संपत आला तरी खरेदी सुरू झालेली नाही. या अगोदर अनेक गैरव्यवहार समोर आले.

त्यामुळे बाजार समित्यांमध्ये पारदर्शक पद्धतीने खरेदी व्हावी अशी शेतकरी, शेतकरी संघटना व खासदारांची आहे. मात्र याकडे केंद्राचे दुर्लक्ष असून नियोजनात अस्पष्टता आहे. खरेदी कधी?, कशी? होणार याबाबत कुठली घोषणा नाही. पारदर्शकता नसल्याने बाजार समितीमध्ये खरेदीच्या मागणीकडे लक्ष लागले आहे.

मागील वर्षी ५ लाख टन कांदा खरेदीचा लक्ष्यांक होता; मात्र तो पूर्ण झालेला नाही. ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ या दोन्ही संस्थांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी पूर्ण केली. ही खरेदी पूर्णतः शिवार खरेदी पद्धतीने झाल्याने यात कुठलीही पारदर्शकता नव्हती. कांदा पट्ट्यातील खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडला. तरीही सरकार याबाबत विचाराधीन का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

...या होत्या गंभीर बाबी

शिवार खरेदीमध्ये कुठलीही पारदर्शकता नाही.

खरेदी दस्तावेज, खरेदीबाबत कुठलाही नोंदी पब्लिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाहीत.

अनेक ठिकाणी खोटे सातबारा देऊनही ही कांदा खरेदी कागदोपत्री उरकवल्याचे आरोप.

‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या भ्रष्टाचारामुळे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सहकारी सोसायट्यांना नाफेड कांदा खरेदीसाठी पर्याय देणार; मात्र हे सरकार दिखाऊपणा करत आहे. अनेकांनी यात भ्रष्टाचार केला. त्यांनीच मोठ्या प्रमाणात आताही कांदा खरेदी करून ठेवलेला आहे.
निवृत्ती न्याहारकर, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभा नाशिक
प्रत्यक्षात आधीच स्वस्तात खरेदी केलेला कांदा व्यापारी कांदा ‘नाफेड’चा कांदा म्हणून दाखवला जाईल. त्यातून पुन्हा शेकडो कोटींचा भ्रष्टाचार होईल. पारदर्शक कांदा खरेदी करून घेणे ही केंद्र सरकार बरोबर राज्य सरकारचीही जबाबदारी आहे. कांदा हा बाजार समित्यांमधून थेट लिलावातून खरेदी करावा. तरच शेतकऱ्यांकडून खरेदी झाली असे म्हणता येईल.
भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
शिवार खरेदीमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार समोर आले आहेत. ही कांदा खरेदी ही बाजार समितीच्या आवारातच व्हावी.
आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती
कांद्याची खरेदी ताबडतोब बाजार समित्यांमध्ये करावी. या बाबत केंद्रीय कृषिमंत्री व ‘नाफेड’च्या अध्यक्षांना पत्र देण्यात आले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील वर्षांसारखा प्रकार करून पुन्हा भ्रष्टाचाराला रान मोकळे करू नये. अन्यथा, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
खासदार भास्कर भगरे, लोकसभा सदस्य, दिंडोरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT