Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Winery Approval: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू वायनरीला परवानगी मिळावी

Sindhudurg Cashew Farmers: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू असून, हजारो टन बोंड वाया जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी काजू वायनरीला परवानगी देण्याची मागणी फळ बागायतदार संघाने शासनाकडे केली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला असून, हजारो टन बोंड वाया जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरिता जिल्ह्यात काजू वायनरीला परवानगी द्यावी, अशी मागणी फळ बागायतदार संघाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.

वातावरणातील बदल आणि शासनाचे उदासीन धोरण यामुळे जीआय मानांकन काजू बीला अपेक्षित दर मिळत नाही. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर काजू बीला मिळत असल्याने काजू उत्पादक दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडत चालला आहे. त्यामुळे किमान काजूच्या बोंडापासून शेतकऱ्यांना काही रक्कम मिळाली तरच शेतकरी भविष्यात तग धरणार आहे. त्यामुळे शासनाने बोंडापासून वाइन बनविण्याची परवानगी द्यावी.

परवानगी मिळाल्यास त्याचा फायदा सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना होणार आहे. सद्यःस्थितीत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही बोंडांवर गोव्यात प्रक्रिया केली जाते. परंतु सरसकट प्रक्रिया होत नाही. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात प्रक्रिया करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील द्राक्ष, संत्री, मोसंबी यांपासून वाइन बनविण्याची परवागनी त्या-त्या भागात आहे. त्याच निकषाप्रमाणे कोकणात बोंडापासून वाइन बनविण्याची परवागनी द्यावी. ही परवागनी मिळाल्यास लाखो काजू उत्पादकांची आर्थिक गाडी रूळावर येण्यास मदत होणार आहे.
विलास सावंत, अध्यक्ष, फळबागायतदार संघ, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT