MLA Yashwant Mane  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दुधाच्या प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठवणार : माने

MLA Yashwant Mane : वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या घरांची पडझड व पिकांची नुकसान भरपाई सुद्धा आता लवकर मिळेल अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.

Team Agrowon

Solapur News : येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दूध दर प्रश्न आम्ही आवाज उठवणार असून, शेतकऱ्यांचा रोष कसा असतो हे शासनाला गेल्या आठवड्यात संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत समजला आहे. वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या घरांची पडझड व पिकांची नुकसान भरपाई सुद्धा आता लवकर मिळेल अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.

पापरी ता मोहोळ येथील छाया बळीराम कासार या महिलेचा पंधरा दिवसापूर्वी अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन करण्यासाठी आमदार यशवंत माने आले होते, त्यावेळी शेतकऱ्यांनी आमदार माने यांच्यासमोर काही व्यथा मांडल्या. २६ तारखेला झालेल्या वादळी वाऱ्याने पापरी, खंडाळी, कोन्हेरी आदी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्याची पाहणीही आमदार माने यांनी केली. यावेळी त्यांनी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांना काही सूचना दिल्या.

वादळी वाऱ्याने पापरी, खंडाळी आदीसह अन्य गावातील विद्युत महावितरणचे अनेक खांब पडून वीज पुरवठा विस्कळित झाला आहे. खांब उभारणीचे काम ही युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र काम लवकर संपविण्यासाठी व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे महेश माळी यांना ‘गॅंग‘ची संख्या वाढविण्याची सूचना दिली.

सध्या पापरी पेनुर स्त्याचे काम गेल्या अनेक वर्षानंतर सुरू झाले आहे. मात्र ते काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे नागरिकांनी आमदार माने यांच्या निदर्शनाला आणून दिले. त्यावेळी आमदार माने यांनी रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराला तंबी देऊन ते काम लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना दिली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, महेश माळी, नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, महिला व बालकल्याण अधिकारी किरण सूर्यवंशी, पंचायत समितीच्या कृषी विभागाचे व्ही. आर. देशमुख, मंडळ निरीक्षक सोमनाथ जाधव, कृषी सहाय्यक लामतुरे, ग्रामसेवक अनंत नकाते, पोलिस पाटील प्रशांत पाटील, सतीश भोसले, आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT