Heavy Rain : वादळी वाऱ्यासह पावसाने सलग तिसऱ्या दिवशी नुकसान

Nashik Rain News : सुरगाणा तालुक्यात सर्वच महसूल मंडलांमध्ये पावसाचा जोर दिसून आला. येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तर दिंडोरी, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड, त्रंबकेश्वर, देवळा तालुक्यांत पावसाने जोर धरला होता.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात चार दिवसांपासून सतत त्याने पाऊस विविध भागात पडत आहेत. सटाणा, त्र्यंबक, सिन्नर, दिंडोरी, देवळा तालुक्यांत अनेक भागात शुक्रवारी(ता.७) मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे तिसऱ्या दिवशी नुकसान झाले.

सुरगाणा तालुक्यात सर्वच महसूल मंडलांमध्ये पावसाचा जोर दिसून आला. येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तर दिंडोरी, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड, त्रंबकेश्वर, देवळा तालुक्यांत पावसाने जोर धरला होता. सटाणा तालुक्यात सर्वदूर मध्यम ते हलका पाऊस झाला. तर मालेगाव तालुक्यातही सर्वदूर कमी-अधिक पाऊस होता; मात्र वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे.

Rain Update
Rain Update : येवला, सिन्नरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

निफाड तालुक्यातील रानवड, ओझर, देवगाव, पिंपळगाव बसवंत, लासलगाव परिसरात पाऊस होता. पिंपळगाव बसवंत परिसरात झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा आला. पिंपळगाव बसवंत येथे शाळेचे पत्रे उडाले.

देवळा तालुक्यातील खामखेडा, सावकी, पिळकोस परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाला. पहिलाच पाऊस मुसळधार झाल्याने परिसरातील नाले तुडुंब भरून वाहिले. अनेक भागात शेतमळ्यातील बांधदेखील मोठ्या प्रमाणावर फुटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Rain Update
Rain Update: पुढील चार दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज

करंजाडी खोऱ्याला सर्वाधिक फटका

सटाणा तालुक्यात करंजाडी खोऱ्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पात्रे उडाले. तर, रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही ठप्प झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळीचे पत्रे उडाल्याने साठवलेला कांदा भिजून पडला आहे. वादळाच्या तडाख्यात विजेचे खांब जमीनदोस्त झाले. करंजाड येथील केदार देवरे यांच्या घराशेजारीच दावणीला बांधलेल्या शेळ्यावर भिंत कोसळल्याने मृत पावल्या आहेत.

वादळात रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडल्याने करंजाडहून भुयाने, निताणे, पारनेर, बिजोटे, आनंदपूर, आखतवाडे, आसखेडा, नामपूर या गावांचा संपर्क तुटला असून, रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे मुख्य विद्युत वाहिनीचे खांब पडल्याने सायंकाळपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी द्राक्ष बागेबर झाडे उमलून केल्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com