Koyna Dam agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Water Issue : कोयनेच्या हक्काच्या पाण्याचा वाद मिटणार का?

Koyna Dam : कोयना धरणातील ३२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यातील उपसा सिंचन आणि खासगी सिंचन योजनांसाठी राखीव आहे.

Team Agrowon

Sangli News : कोयना धरणातील ३२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यातील उपसा सिंचन आणि खासगी सिंचन योजनांसाठी राखीव आहे. वास्तविक सांगली पाटबंधारे विभागाने मागणी करायची आणि कोयनेतून ते सोडायचे, असेच अपेक्षित आहे.

मात्र, कोयनेतून सांगली जिल्ह्याला पाणी सोडण्यासाठी साताराचे पालकमंत्री खोडा घालत आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद मिटणार का? आणि जिल्ह्याला पाणी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

कोयना धरणातील ३५ टीएमसी पाणी पूर्वेकडील योजनांसाठी राखीव ठेवण्याचे पहिले नियोजन आहे. त्यातील ३ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यासाठी आहे. उर्वरित ३२ टीएमसी पाण्याचा हक्क सांगली जिल्ह्याचा आहे.

त्यावर डाळिंब, द्राक्ष, ऊस, भाजीपाला शेतीसह सांगली, कुपवाड, इस्लामपूर, आष्टा, पलूस, कडेगाव या मोठ्या शहरांसह अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. यंदा पाऊस कमी झाल्याने टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कोयनेतून पाणी सोडावे यासाठी जिल्ह्यात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यामध्ये पाणी वाटपाचे धोरण ठरले.

पहिल्या टप्प्यात दोन टीएमसी पाणी सोडले. त्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्ती केल्याने पुन्हा दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे विभागाने कोयना धरण व्यवस्थापनाकडे २ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. ती सोमवारी पूर्ण होईल. त्यानंतर पाणी थांबवले जाणार आहे.

‘पाटबंधारे’चा प्रस्ताव

सध्याचे कोयनेतून पाणी - ८५ टीएमसी

सिंचन योजनांसाठी पाणी - ३५ टीएमसी

विद्युत निर्मितीसाठी पाणी - ३५ टीएमसी

जून-जुलै २०२४ साठी राखीव - १५ टीएमसी

कालवा सल्लागार समितीचा प्रस्ताव

सिंचनाला हवे अतिरिक्त - ९ टीएमसी

वांग, तारळी धरणातून - २.७५ टीएमसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT