Chandrashekhar Bawankule: Agrowon
ॲग्रो विशेष

Revenue Minister Chandrashekhar Bawankule: रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी चौपट मोबदला मिळवून देणार

Ratnagiri-Nagpur Highway: रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील चोकाक-उदगाव अंकली भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने चौपट भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Kolhapur News: रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील चोकाक-उदगाव अंकलीपर्यंतच्या दहा गावांतील बाधित शेतकऱ्यांची चौपट भरपाई देण्याची मागणी आहे. राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे या बाबत प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळवून देणार आहे. एकाच मार्गासाठी दोन वेगवेगळे दर देण्याचा निर्णय अन्यायकारक होता.

त्यामुळे शेतकऱ्यांना चौपट दर देणार असून, शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये. शिवाय महामार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सकारात्मक प्रस्ताव राज्य सरकारकडे तातडीने पाठविण्याचा आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

मुंबई येथे मंत्रालयात बुधवारी (ता. १६) दुपारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यतेखाली चोकाक-उदगाव अंकली चौपट भरपाईप्रश्‍नी बैठक झाली. या वेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील १० गावांतील शेतकऱ्यांची समस्या सोडविणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार माझ्याशी संपर्क साधून या बाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना चौपट भरपाई देण्याची मागणी केली.

या वेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोक माने यांनी महामार्गाच्या कामासाठी ३३ किलोमीटर अंतरातील जमिनी संपादित केल्या जात होत्या. परंतु याच महामार्गासाठी इतर भागातील शेतकऱ्यांना जमिनीच्या चौपट दराने मोबदला मिळत असताना १० गावांतील शेतकऱ्यांना दुप्पट दर मिळणार असल्याने शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत.

ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी मांडली आहे. शिवाय ४ पट मोबदल्याची मागणी केली होती. यासह विविध समस्या त्यांनी मांडल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आभासी पद्धतीने (व्हीसी) विविध माहिती दिली. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी विविध माहिती मांडली.

शेतकऱ्यांतून समाधान

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळवून देणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT