Junnar Tourism Agrowon
ॲग्रो विशेष

Tourism Development : पर्यावरणाला धक्का न लावता जुन्नर पर्यटन विकास करणार

Team Agrowon

Pune News : ‘‘मी पर्यावरण संवर्धनाचा चाहता आहे. तो माझा आवडीचा विषय आहे. जुन्नर पर्यटन विकासाची कामे मार्गी लावत असताना जे नैसर्गिक आहे, त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नका. पर्यावरणाला कोणताही धक्का न लागता दर्जेदार कामे झाली पाहिजेत. पर्यावरण संवर्धनासाठी शक्य ती सर्व पावले उचलली जातील,’’ असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

आमदार अतुल बेनके यांच्या पुढाकाराने करण्यात येत असलेल्या जुन्नर पर्यटन विकास आराखडा बैठकीमध्ये रविवारी (ता.१८) उपमुख्यमंत्री पवार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी श्री. पवार म्हणाले, ‘‘जुन्नर तालुक्यात पाच धरणे, गडकिल्ले, लेण्या समूह, निसर्ग समृद्ध आदिवासी भाग, प्रगतशील शेती आदी पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या गोष्टी आहेत. येथील जैवविविधता, आदिवासी परंपरा तसेच जीवसृष्टीला धक्का न लावता परिसरातील सरपंच, ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन तालुक्याचा टप्प्याटप्प्याने पर्यटन विकास केला जाईल.

पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला आहे. याद्वारे अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. मी पर्यटन उद्योगाच्या मागे ठामपणे उभा असून, पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. दिलेल्या निधीतून कामे दर्जेदार झाली पाहिजेत. कामे दर्जेदार न झाल्यास कारवाईची हायगय केली जाणार नाही,’’ असा सज्जड दमही त्यांनी दिला

या वेळी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सल्लागार संस्थेकडून विकास आराखड्याचे सादरीकरण केले. विविध गावांच्या सरपंचांनी आपल्या गावाच्या पायाभूत सुविधा आणि विकासाबाबतची निवेदने सादर केली.

‘गाडी करून बारातमीचा विकास बघायला या’

‘‘बारामतीमधील वनविभागाच्या जागेचा पर्यावरणपूरक विकास केला आहे. याठिकाणी केलेल्या तळ्याच्या विकासामुळे परिसरातील जैवविविधता समृद्ध झाली आहे. मोरांससह परदेशातील स्थलांतरित पक्षी येऊ लागले आहेत. हा पर्यावरणपूरक विकास पाहण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडी करून, बारामतीला यावे, त्यानुसार जुन्नर पर्यटनाचा विकास करावा,’’ असा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

‘म्हणून कासपठारचा ऱ्हास’

कास पठारावरील पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे या ठिकाणी कुंपण घालण्यात आले होते. मात्र कुंपण घातल्याने गायी-म्हशींचा वावर कमी झाल्याने त्यांच्या शेण आणि मूत्रामुळे जो फायदा व्हायचा तो बंद झाला. आणि फुले फुलण्याचे बंद झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यामुळे कुंपण काढण्याचा निर्णय घेत, पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याची यंत्रणा उभारण्यात आल्याचे पवार यांनी आवर्जुन सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT