Junnar Tourism : सरपंचांच्या सहभागातून होणार जुन्नरचा पर्यटन विकास

Tourism Development : जुन्नर तालुक्याला पर्यटन दर्जा मिळाला, मात्र त्यानंतर कोणत्याही तांत्रिक बाबी पूर्ण न झाल्याने निधी उपलब्ध झाला नाही.
Tourism
TourismAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘कृषी आणि निसर्ग संपन्न जुन्नर तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सरपंचांच्या सहभागातून डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) करण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि पर्यटन संचालनालयाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. हा अहवाल अर्थसंकल्पापूर्वी सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यटन विभागाला दिले आहेत.

सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा आराखडा असणार असून, टप्प्याटप्प्याने पुढील पंधरा वर्षांत विकास कामे पूर्ण होऊन पर्यावरण समृद्ध पर्यटन तालुका असा जुन्नर तालुक्याचा राज्यात नावलौकिक होणार आहे,’’ अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

जुन्नर तालुक्याच्या पर्यावरणपूरक पर्यटनाचा समृद्ध आराखडा करण्यासाठी आमदार बेनके यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि पर्यटन क्षेत्रातील अभ्यासक, कार्यकर्ते यांची बैठक नुकतीच झाली. बैठकीला पर्यटन संचालिका शमा पवार, तहसीलदार रवींद्र सबनीस, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्यासह भारतीय पुरातत्त्व विभाग, जलसंपदा विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

Tourism
Tourism Season : पर्यटकांची खुष्‍कीच्या मार्गाला पसंती

याबाबतची माहिती देताना आमदार बेनके म्हणाले, ‘‘जुन्नर तालुक्याला पर्यटन दर्जा मिळाला, मात्र त्यानंतर कोणत्याही तांत्रिक बाबी पूर्ण न झाल्याने निधी उपलब्ध झाला नाही. याबाबत मी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. यानंतर त्यांनी यांनी डीपीआर त्वरित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागाला दिल्याने या कामाला चालना मिळाली आहे. यासाठी देशपातळीवरील सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.’’

‘क्यूआर कोडद्वारे माहिती मिळणार’

आमदार बेनके म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यात किल्ले शिवनेरीसह तालुक्यातील वीस पर्यटनस्थळे विकसित करण्यात येणार आहेत. या ठिकाणी नाम फलक, दिशादर्शक फलक, क्यूआर कोडद्वारे सर्व माहिती पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.

Tourism
Tourism Policy : महिला उद्योजिकांना ‘आई’ चे पाठबळ

पर्यटनाचा त्रिमितीय आराखडा केला जाणार असून, पर्यटकांना गाइडशिवाय पर्यटनस्थळाची माहिती क्यूआर कोड स्कॅन करून मिळणार आहे. पर्यटकांना तालुक्यातील नैसर्गिक, धार्मिक, ऐतिहासिक, जैवविविधता आदींची माहिती क्यूआर कोडद्वारे उपलब्ध होणार आहे.’’

पर्यटनस्थळांची माहिती संकलित करण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, पर्यटन क्षेत्राशी संबंधित यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. संकलित माहिती तहसीलदारांकडे सादर केली जाईल. त्यांच्यामार्फत सल्लागार यांना ही माहिती दिली जाईल. ६ जानेवारीपर्यंत सल्लागारांना तालुक्यातील पर्यटनस्थळांची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर सल्लागार विविध पर्यटनस्थळांना भेटी देऊन, अहवाल सादर करतील, या अहवालाला पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
- अतुल बेनके, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com