Krushi Seva Kendra Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Seeds Issue: बोगस बियाणे, खते विक्री करणाऱ्यांना चाप लावणार

Agriculture Fraud: खरीप हंगाम सुरू होत असतानाच बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांविरुद्ध कृषी विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे.

Team Agrowon

Pune News: खरीप हंगाम सुरू होत असतानाच बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांविरुद्ध कृषी विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील १७ कृषी सेवा केंद्रांना तातडीने विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, शिरूर तालुक्यातील एका खासगी कंपनीवर बेकायदा खतसाठाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा कृषी विभागाने १५ भरारी पथके तयार केली आहेत. ही पथके जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील कृषी सेवा केंद्रांवर अचानक धाडी घालून तपासणी करत आहेत. या तपासणीत अनेक केंद्रांवर गंभीर अनियमितता आढळल्या आहेत.

जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासणीत १५ कृषी सेवा केंद्रांवर उघडपणे नियमभंग झाल्याचे आढळले असून त्यांच्यावर तत्काळ विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या केंद्रांमध्ये सात खत विक्री केंद्रे, नऊ बियाणे विक्री केंद्रे, एक कीटकनाशक विक्री केंद्रांचा समावेश आहे.

येथे करा तक्रार

बियाणे, खते, कीटकनाशके जादा दराने विकणे, खरेदी पावती न देणे, दुसऱ्या निविष्ठेच्या खरेदीसाठी सक्ती करणे, निविष्ठा उपलब्ध असूनही विक्री न करणे, मुदतबाह्य निविष्ठा विकणे, या प्रकारांमध्ये शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय अथवा कृषी विभागाच्या नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, असे कृषी विभागाकडून आवाहन केले आहे.

कोणकोणत्या त्रुटी आढळल्या?

बियाण्याच्या परवान्यात उगमपत्राचा (बियाण्याचा मुख्य स्रोत) अभाव,अधिक दराने विक्री,परवाना नूतनीकरण विहित नमुन्यात न करणे,शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, शेतकऱ्यांना पक्की खरेदी पावती न देणे, निविष्ठा उपलब्ध असूनही विक्रीस नकार देणे, एक निविष्ठा घेताना दुसरी जबरदस्तीने घेण्याची अट, मुदतबाह्य निविष्ठांची विक्री

शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रांमधूनच खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत. खरेदी करताना पक्के बिल अवश्य घ्यावे. एमआरपीप्रमाणेच खरेदी करावी. कोणीही साठेबाजी करून किंवा अधिक दराने विक्री करत असल्याचे आढळल्यास कृषी विभागाच्या नियंत्रण कक्षास तक्रार करावी. तुमच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT