Turmeric Farming: सेंद्रिय निविष्ठा वापरातून हळद लागवडीवर भर

Turmeric Cultivation: साताऱ्यातील किकली गावातील सचिन बाबर यांनी सेंद्रिय हळद लागवडीतून यशस्वी शेती मॉडेल उभारले आहे. सेंद्रिय निविष्ठांचा शास्त्रशुद्ध वापर, पीक फेरपालट, आंतरपिके आणि कुटुंबाचा सहभाग या त्यांच्या यशामागील प्रमुख गोष्टी आहेत.
Turmeric Farming
Turmeric FarmingAgrowon
Published on
Updated on

Turmeric Farming Management:

शेतकरी नियोजन

हळद

शेतकरी : सचिन जगन्नाथ बाबर

गाव : किकली, ता. वाई, जि. सातारा

शेती : अडीच एकर

सातारा जिल्ह्यातील किकली (ता. वाई) येथील सचिन जगन्नाथ बाबर हे तरुण शेतकरी आहेत. त्यांची अवघी अडीच एकर शेती आहे. २०१४ मध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व जाणल्यानंतर त्यांनी स्वतःकडील संपूर्ण शेती सेंद्रिय करण्याचे ठरविले. यासाठी पुणे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सेंद्रिय पद्धतीने दरवर्षी दीड एकर क्षेत्रात ऊस, तर उर्वरित एक एकरात हळदीचे पीक घेण्यास सुरुवात केली.

हळद व उसाची शेती शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने केली जाते. त्यासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर, जैविक पद्धतीने पीक संरक्षण, पीक फेरपालट, हिरवळीच्या पिकांची लागवड आदी बाबींवर भर दिला जातो. सेंद्रिय पद्धतीने हळद उत्पादन घेण्यासाठी कृषी विभाग वाई व बोरगाव येथील केव्हीके तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. शेती पूर्णतः सेंद्रिय करण्यात सचिन बाबर यशस्वी झाले आहेत.

Turmeric Farming
Turmeric Farming: हळद उत्पादन वाढीचे सुधारित तंत्र

दरवर्षी साधारण जून ३० गुंठे क्षेत्रावर हळद लागवड करून फेब्रुवारीमध्ये काढणी केली जाते. त्यानंतर या क्षेत्रात उसाची लागण करून काळा घेवड्याचे आंतरपीक कायम घेतले जाते. या घेवड्याला उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या हळदीपासून पावडर तयार करून पॅकिंगद्वारे विक्री केली जाते. सेंद्रिय हळदीस ग्राहकांकडून चांगली मागणी असते. शेती कामांमध्ये वडील जगन्नाथ बाबर यांच्यासह हळद पॅकिंग व इतर कामांमध्ये आई द्रौपदा, पत्नी आरती आणि मुले चिन्मय व अनुराज यांची मदत मिळते, असे सचिन बाबर सांगतात.

फेब्रुवारी महिन्यामध्ये खोडव्या तुटून गेल्यानंतर २० फेब्रुवारीच्या दरम्यान पाचट कुट्टी केली जाते. त्यानंतर लगेच तागासह चवळी व उडदाचे बियाणे एकत्रित करून शेतात विस्कटले जाते. नंतर खोडव्याच्या बुडक्यांवर रोटर मारला जातो. त्यानंतर साधारण ६-७ फुटांवर पाट काढून पाणी सोडले जाते. ताग पिकास साधारण दोन ते तीन वेळा सिंचन केले जाते. त्यानंतर पीक दीड महिन्याचे झाल्यानंतर पीक जमिनीत गाडले जाते. त्याचा हळद पिकास चांगला फायदा होतो. त्यानंतर १० एप्रिलच्या आठ ते दहा दिवसांनी रान तयार केले जाते. त्यावरती कुजवलेले शेणखत विस्कटून रोटर मारून शेत हळद लागवडीसाठी तयार केले जाते.

Turmeric Farming
Turmeric Cultivation: हळद लागवडीसाठी सुधारित वाण निवड महत्त्वाची

शेतामध्ये शेणखत वापरावर जास्त भर दिला जातो. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सहा ते सात ट्रॉली शेणखत सावलीमध्ये एकाजागी ढीग करून ठेवले जाते. या ढीगावर मायक्रो स्प्रिंकलरने सतत पाणी सोडून ते ओले केले जाते. त्यावर गोकृपा अमृत, वेस्ट डी कंपोजर, जीवामृत यांच्या मात्रा दिल्या जातात. ठरावीक कालावधीनंतर शेणखताचा ढीग जेसीबीच्या साह्याने पलटी केला जातो. साधारण दीड ते दोन महिने शेणखत तसेच ठेवल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने कुजून उत्तम प्रतीचे खत तयार होते.

लागवड नियोजन

प्रत्येक वर्षी साधारणपणे ३० गुंठे क्षेत्रावर हळद लागवडीचे नियोजन असते. त्यानुसार पूर्वमशागत करून शेत तयार केले जाते. हळद लागवडीपूर्वी ताण, चवळी, उडीद यांची लागवड करून पीक जमिनीत गाडले जाते.

दर तीन वर्षी पीक फेरपालटीवर भर दिला जातो. एका शेतात साधारण तीन वर्षांनी पुन्हा हळद पीक येईल असे नियोजन केले जाते.

पूर्वमशागत केल्यानंतर आठ ते दहा दिवस शेत तसेच ठेवून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळद लागवडीचे नियोजन असते.

लागवडीसाठी चार फुटांचे गादीवाफे तयार केले जातात. त्यावर दोन ओळींत एक फूट, तर दोन गड्ड्यांत नऊ इंच अंतर राखत झिगझॅक पद्धतीने लागवड केली जाते.

३० गुंठे क्षेत्रावर लागवडीसाठी साधारणपणे ७ ते ७ क्विंटल हळद बेणे पुरेसे होते.

हळद लागवडीमध्ये ठिबक आणि गरजेनुसार पाटपाणी पद्धतीचा वापर केला जातो.

लागवड केल्यानंतर जीवामृत व गोकृपामृत यांचा दर पंधरा दिवसांनी फेरपालट पद्धतीने वापर केला.

लागवडीनंतरचे नियोजन

सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत करपा रोगापासून पिकाचा बचाव करण्यासाठी आंबट ताक, गोकृपा अमृत आणि जिवामृताच्या फवारण्या घेतल्या जातात.

छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने दोन ते तीन महिन्यांनी भरणी केली जाते. भरणीच्या वेळी निंबोळी पेंड आणि गांडूळखत किंवा कुजलेले शेणखताचा भरीसाठी वापर केला जातो.

हळद लागवडीमध्ये आंतरपिकांची लागवड केली जाते. आंतरपिकासाठी फरसबी, चवळी व उडीद ही पिकांच्या लागवडीस प्राधान्य दिले जाते.

जिवामृत व घनअमृताचा वापर जास्तीत जास्त केला जातो.

- सचिन बाबर,

७५८८३८२९५८/९२२६५०३५०२

(शब्दांकन : विकास जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com