Orange Processing Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Processing : संत्रा प्रक्रिया केंद्र, विक्रीबाबत सहकार्य करणार

Orange Orchard : संत्रा बागा व फळांची गुणवत्ता उत्कृष्ट असून उच्चतम उत्पादन घेतले जात आहे.

Team Agrowon

Washim News : संत्रा बागा व फळांची गुणवत्ता उत्कृष्ट असून उच्चतम उत्पादन घेतले जात आहे. आगामी काळात संत्रा प्रक्रिया केंद्र व विक्री व्यवस्थापनाबाबत पर्यायी व्यवस्था उभारणीसाठी करडा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सहकार्य केले जाईल, असे आश्वासन संस्थाध्यक्ष तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी दिले.

सुविदे फाउंडेशनअंतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने जिल्ह्यात संत्रा गट शेती उपक्रम राबवला जात आहे. यामुळे संत्रा लागवड क्षेत्र झपाट्याने वाढते आहे. यंदाच्या या बहाराची फळ तोडणी हंगामाला प्रारंभ झाला.

केव्हीकेचे दत्तक ग्राम वडजी (ता. रिसोड) येथे संत्रा फळ तोडणीची सुरुवात श्री. देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्राथमिक स्वरूपात अमित विलास बोरकर व शिवाजी शेजूळ यांच्या बागेत फळ तोडणी केली गेली.

याप्रसंगी विलास बोरकर, राजेश बोरकर, शिवाजी शेजूळ, विनोद बोरकर, शिवाजी बोरकर, गजानन बोरकर, प्रदीप पाटील, सतीश बोरकर, विठ्ठल बाजड, संतोष बाजड, अकातराव बोरकर, शंकरराव बोरकर, आश्रुजी शेजूळ, पोलिस पाटील प्रदीप बोरकर, अमित बोरकर, शरद कावळे, सलमान पठाण, रियाज पठाण यांच्यासह संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमच्या गावात या हंगामात ३१ बागांमध्ये फळांची तोडणी होणार आहे. काही बागांमध्ये नुकतेच पूजन करून तोडणीला प्रारंभही झाला. यंदा आमच्या बागेतील संत्र्याचा माल ८११ रुपये क्रेटने सौदा केला आहे. दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या मालाला ८७० रुपये प्रति क्रेटचा दर निश्चित झाला आहे. दर चांगले मिळावेत, या आशेवर सर्व संत्रा उत्पादक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT