Team Agrowon
बाजारात संत्रीची आवक सुरु असून भाव दबावात दिसून येत आहेत.
त्यातच वाढत्या थंडीमुळे संत्रीला उठाव कमी दिसतो. राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये संत्रीची आवक जास्त दिसते.
मुंबईच्या बाजारात जवळपास ३ हजार क्विंटलची आवक झाली होती.
तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक कमी जास्त होती.
संत्र्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. संत्र्याची आवक कमी होताना दिसत आहे.
तसेच थंडी कमी झाल्यानंतर संत्र्याला पुन्हा उठाव मिळू शकतो, त्यामुळे संत्र्याच्या भावालाही आधार मिळेल, असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.