Wild Vegetables  Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Vegetables : पुरंदर किल्ले परिसरात बहरल्या रानभाज्या

Purandar Fort : पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोंडकेवाडी, बहिरवाडी, पानवडी, चिव्हेवाडी परिसरात अनेक रानभाज्या बहरल्या आहेत.

Team Agrowon

Pune News : पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोंडकेवाडी, बहिरवाडी, पानवडी, चिव्हेवाडी परिसरात अनेक रानभाज्या बहरल्या आहेत. या परिसरातील नागरिक दैनंदिन जीवनात औषधी वनस्पती व रानभाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.

या परिसरात आढळणाऱ्या रानभाज्या बनवण्याच्या पद्धती व त्यांच्या उपयोगासंदर्भात आदिवासी महिलांकडून माहिती घेतली असता त्यांनी १५ प्रकारच्या रानभाज्या या परिसरात उपलब्ध असल्याचे सांगितले.

या डोंगर रांगांमध्ये चिंचारडी, शेंडवळ, कर्टुले, पत्राची भाजी, मोरचवडा, आळींब, चिवळ, रान कुरडू, रान आळू, गायफळ, टाकळ्या, रान भोपळा, तांदुळजा, मायाळू, केना व पाथरी आदी प्रकारच्या भाज्या आढळतात.

आयुर्वेदात या वनस्पतींचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असून प्रत्येक भाजी तयार करण्याची वेगळी पद्धत आहे. या भाज्या बनवताना कडधान्यांच्या डाळींचा समावेश केला जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्या पूजा चिव्हे यांनी सांगितले.

पावसाळ्यात या रानभाज्या उपलब्ध होतात. या काळात पाऊस जास्त असतो. त्यामुळे शेतात भात लागणीबरोबर इतर कामे सुरू असतात. या काळात बाजारात जाता येत नसल्याने आम्ही रानभाज्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये करत असून मी लहानपणापासून या भाज्या खात असल्याचे पासष्ट वर्षांच्या आजी रत्नाबाई चिव्हे यांनी सांगितले.

तसेच या भाज्यांचा आहारात समावेश असल्याने आजपर्यंत कोणताही आजार झाला नसल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी मैनाबाई चिव्हे व निलम चिव्हे या आदिवासी महिला उपस्थित होत्या. पुरंदर किल्ल्याच्या परिसरात अनेक आदिवासी खेडी आहेत.

ग्रामीण जीवनशैलीचा व त्यांच्या आहाराचा विचार केला असता या रानभाज्यांचा आहारात उपयोग केल्याने या परिसरातील नागरिकांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याचे येथील रानभाज्या वनस्पती अभ्यासक रोहिदास कोंडके यांनी सांगितले. या रानभाज्यांना शहरात मोठ्या प्रमाणात मागणी असून या भाज्या शहरापर्यंत पोहचल्यास त्यांना चांगली किंमत मिळून आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Competition: ‘अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे’

Soil Mining Scam: वाडा तालुक्यात चिंचघरमध्ये कोट्यवधींचा माती घोटाळा

Farmer ID: ‘फार्मर आयडी’अभावी साताऱ्यातील तीन हजार शेतकरी मदतीपासून वंचित

Latur APMC: अडत बाजारात हमीभावानेच शेतीमालाची खरेदी करा

Agrowon Podcast: शेवगा पोचला २० हजारांवर,हरभरा दबावातच,संत्री आवक कमी,ज्वारीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT