Wild Vegetables : रानभाज्यांना चांगला उठाव

Wild Vegetables Market : खानदेशात रानभाज्यांची सातपुडा पर्वतालगतच्या मोठ्या गावांसह लहान शहरे व अन्य भागांत रेचलेच दिसत आहे.
Wild Vegetable
Wild VegetableAgrowon
Published on
Updated on

Jalgoan News : खानदेशात रानभाज्यांची सातपुडा पर्वतालगतच्या मोठ्या गावांसह लहान शहरे व अन्य भागांत रेचलेच दिसत आहे. करटुल्यांची अधिकची आवक होत आहे. कमाल रानभाज्यांचे दर २०० ते २५० रुपये प्रतिकिलो, असे यंदा आहेत.

सातपुड्यालगतची मंडळी या रानभाज्या विक्रीसाठी आणत आहेत. बाजार समित्या किंवा घाऊक बाजारांत त्यांची आवक, लिलाव किंवा विक्रीही नाही. सातपुड्यातील व अन्य मंडळी या रानभाज्या तोडून आणते व त्याची आठवडी व अन्य बाजारांत विक्री करीत आहे. सध्या बाजारात करटुले, दोडी, चिल्याची भाजी व अन्य रानभाज्या विक्रीसाठी येत आहेत.

Wild Vegetable
Wild Vegetable : गावरान भाज्या बाजारातून गायब

या भाज्या वजनाला हलक्या, पण आरोग्यदायी असल्याने शहरातील मंडळी त्यांची लागलीच खरेदी करीत आहेत. अनेक भागात मुख्य मार्ग, मुख्य बाजारपेठांत दोडी, चिल्याची भाजी, करटुली विक्रीसाठी आलेली दिसत आहेत. करटुल्यांची आवक मागील महिन्यात सुरू झाली. दोडीच्या फुलांची आवकही मागील महिन्यात अधिक होती.

या महिन्यातही काही भागात त्यांची आवक सुरू आहे. तर चिल्याची भाजी केळी व अन्य बागायती क्षेत्रांत सहज उपलब्ध होत असून, त्याचीही बऱ्यापैकी विक्री होत आहे. चिल्याची भाजी कमाल ८० रुपये प्रतिकिलो या दरात विक्रीस उपलब्ध आहे. दोडीचे दर २०० रुपये प्रतिकिलो असे आहेत. तर करटुल्यांचे दरही १८० ते २०० रुपये प्रतिकिलो असे आहेत.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, अक्लकुवा, नवापूर, साक्री, धुळे, चाळीसगाव, पाचोरा आदी भागांत रानभाज्या विक्रीस येत आहेत. जामनेर, पाचोरा, चाळीसगाव भागात सातमाळा, अजिंठा डोंगरातील रानभाज्या येत आहेत.

Wild Vegetable
Forest Vegetable : बखर रानभाज्यांची : समृद्ध करणारा प्रवास

तर चोपडा, रावेर, यावल, शहादा, तळोदा, शिरपूर, जळगाव, यावल आदी भागात सातपुड्यातील रानभाज्या विक्रीस येत आहेत. या भागातील मंडळी सकाळीच शहरात किंवा नजीकच्या मोठ्या गावांत दाखल होते. काही तासांत या रानभाज्यांची विक्री होते. परंतु या रानभाज्यांसाठी पर्वतीय क्षेत्रात. खोऱ्यांत दिवसभर चिखल, काटेरी झुडपे पार करीत फिरावे लागते, असे विक्रेते सांगतात.

रानभाज्यांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

कारटूले---२००

दोडी---२०० ते २२०

चिल्याची भाजी---८० ते १००

रानमटाळू---२५०

रानआल---२२० ते २४०

केना---१०० ते १२०

तरोटा---१५० ते २००

काटवल---१५० ते १८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com