Rabbi Jowar Area Agrowon
ॲग्रो विशेष

Rabbi Jowar : रब्बी ज्वारीसाठी कोळपणी का आहे महत्वाची?

Jowar Farming : जमिनीतील ओल वेगवेगळ्या मार्गाने कमी होत असते. महाराष्ट्रातील बहुतांशी जमिनी या कोरडवाहू प्रकारच्या असल्यामुळे रब्बी पिकात ओल टिकून राहत नाही. अशावेळी कोळपणी केल्यामुळे जमिनीतूल ओलावा टिकून राहतो आणि पिकाची पाण्याची गरज भागवली जाते.

Team Agrowon

Jowar Cultivation : जमिनीतील ओल वेगवेगळ्या मार्गाने  कमी होत असते. महाराष्ट्रातील बहुतांशी जमिनी या कोरडवाहू प्रकारच्या असल्यामुळे रब्बी पिकात ओल टिकून राहत नाही. अशावेळी कोळपणी केल्यामुळे जमिनीतूल ओलावा टिकून राहतो आणि पिकाची पाण्याची गरज भागवली जाते.

जमिनीत साठून राहिलेली ओल पिके वापरतात.जमिनीच्या वरच्या थरातून बाष्पीभवनामुळे ओल उडून जात असते. याशिवाय जिमिनीला भेगा पडल्यामुळे बाष्पीभवन होऊन जमिनीतील ओल कमी होते. तसच पिकामध्ये तण जास्त प्रमाणात असेल तरीही जमिनीतील ओल कमी होत असते. जमिनीतील उपलब्ध पाण्यापैकी पिकाच्या प्रत्यक्ष वाढीसाठी अतिशय कमी प्रमाणात पाणी लागते. जमिनीतील सुमारे ६० टक्के ओल ही बाष्पीभवनामुळे उडून जात असते. जमिनीतील ओल जर टिकवून ठेवायची असेल तर पिकामध्ये कोळपणी करणे फायद्याचे ठरते. कोळपणीमुळे माती हलवून मोकळी झाल्याने जमिनीवर एक पोकळ थर तयार होतो. त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते.  

कोळपणी केंव्हा करावी?

एकदा कोळपणी केली तर पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. त्यामुळे कोरडवाहू  रब्बी ज्वारी करिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केलेली आहे. पहिली कोळपणी पीक तीन आठवड्याचे झाल्यावर फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे वाढणारे तण नष्ट  होऊन पाण्याची बचत होते. दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी. त्यावेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला बारीक भेगा पडत असतात, त्या कोळपणीमुळे बंद होतात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया कमी होते. तिसरी कोळपणी ही पीक आठ आठवड्याचे झाल्यावर करावी. ही कोळपणी दातेरी कोळप्याने करावी. कारण जमीन टणक झाल्याने फासाचे कोळपे नीट चालत नाही.  

दातेरी कोळपे वापरल्यास ते मातीत व्यवस्थित घुसून माती मोकळी करते, त्यामुळे भेगा बुजविल्या जातात. ज्यावेळी जमिनीत ओल फार कमी असेल त्यावेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास फायदा होतो. कोरडवाहू रब्बी ज्वारी तयार होण्यास साधारणपणे १८० पासून २८० मिमी ओल लागते. त्यापैकी ४० टक्के ओल पीक फुलोऱ्यात येण्यापासून तयार होण्याच्या अवस्थेत लागते म्हणून ओल साठविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत.  आंतरमशागतीमध्ये खुरपणी देखील करावी लागते. पण सुरवातीला ज्यावेळी जमीन मऊ असते आणि तण वाढत असते, त्यावेळेसच या खुरपणीचा फायदा होतो. म्हणून बैल कोळपे चालविल्याने खोलवर मशागत करता येते. जमीन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो. जास्तीची रोपे काढून टाकणे हा पण एक ओलावा टिकविण्याचा चांगला उपाय आहे. अशा प्रकारे जमिनीतील ओल टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यास पिकाची पाण्याची गरज भागविता येते. 

कोळपणीचे फायदे 

पीक वाढताना त्याबरोबर तणही वाढत. हे तण पाणी अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करत. पीक उगवून आल्यावर त्यात ठराविक दिवसानंतर कोळपणी केली जाते. या कोळपणीचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थांबविणे हा असतो. तणामुळे कमी होणारी ओल, तणांचा बंदोबस्त केल्याने राखली जाते. याशिवाय माती हलवून मोकळी केल्याने जमिनीवर एक पोकळ थर तयार होतो. त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. यामुळे ओल टिकवून धरण्यामध्ये कोळपणीचा फार मोठा वाटा आहे हे लक्षात घ्या.

माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watershed Development Management : शाश्वत विकासात पाणलोट क्षेत्राचे महत्त्व

PM Modi On Dhan : सत्ता दिल्यास धानाचा एमएसपी ७८० रूपयांनी वाढवू; पंतप्रधान मोदी यांचे झारखंडवासियांना आश्वासन

Winter Season : हिवाळी हंगाम आणि थंडीस सुरवात

JPC On Waqf Board : भाजपचे आरोप आणि तणावानंतर जेपीसीची कर्नाटक वल्फ बोर्ड प्रकरणात उडी; घेणार तक्रारदार शेतकऱ्यांची भेट

Vaccination Animals : परजिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या जनावरांचे लसीकरण सक्तीचे, पशुसंवर्धन विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT