Urea Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Fertilizers : सोयाबीन पिकासाठी युरियाचा वापर का वाढला आहे 

Agriculture Fertilizers : गेल्या महिन्याभरात भेटून आणि फोनवर किमान ३० ते ३५ शेतकऱ्यांना “सोयाबीनची पेरणी करताना कोणते रासायनिक खत पेरले आहे?"

डॉ. सोमिनाथ घोळवे

Fertilizers Use : गेल्या महिन्याभरात भेटून आणि फोनवर  किमान ३० ते ३५ शेतकऱ्यांना “सोयाबीनची पेरणी करताना कोणते रासायनिक खत पेरले आहे?" हा कॉमन प्रश्न विचारला. त्यावर शेतकऱ्यांकडून पेरणीची सुरुवात ही 20:20:13 /26:26:13/ 24: 24:00 या रासायनिक खतांच्या डोसाने या डोसाने केल्याचे सांगितले. मात्र पाऊस पडल्यानंतर युरियाचा डोस दिला आहे हे सांगण्यास विसरले नाहीत. 

युरियाचा डोस का दिला असे विचारले असता, शेतकऱ्यांकडून 'युरिया'. या रासायनिक डोस दिल्याशिवाय पीक हिरवे दिसत नाही की वाढ होत नाही असे सांगण्यात आले. एकंदर युरिया खत पेरल्याशिवाय शेती उत्पन्न नाही की शेती नाही हे समीकरण बनले आहे. त्यामुळे पिकांची वाढ होऊ लागली की युरिया या खताचा डोस देणे सुरू होते. थोडा पाऊस झाला की युरियाचा डोस दिल्याशिवाय पर्याय नाही ही मानसिकता मी संवाद साधलेल्या शेतकऱ्यांची झाली असल्याचे दिसून आली. रासायनिक खताच्या बाबतीत शेतकऱ्यांची जागृती, मार्गदर्शन असायला हवे ते अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांचे नसल्याचे दिसून येते. 

'युरिया' या रासायनिक खताने शेतीची आणि पिकांची वाट लागत आहे. युरियाचे वैशिष्ट्ये असे की, अतिवापरामुळे जमीनमध्ये खट्टपणा येतो, शिवाय उत्पादन जास्त मिळेल असे होत नाही. पीक तेजदार आणि हिरवीगार दिसतात. मात्र थोडे पाणी कमी पडले किंवा पावसाचा खंड पडला असता पीक करपण्यास सुरुवात होते, पिके सुकून जातात. 

जाणकार शेतकरी सांगतात की, युरियाचा जास्त वापर पिकांसाठी आणि जमिनीसाठी चांगला नाही. ज्यावेळी युरिया वापरात नव्हते त्यावेळी बैलांनी नांगरणी होत होती. पण आता टॅक्टरने सुद्धा नांगरणी करणे कठीण होऊ लागले आहे. थोडा पाऊस झाला तर टॅक्टरच्या नांगराने शेतीची नांगरट होते.  जास्त उत्पादन मिळेल या आशेने "युरिया" या रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. पण शेतीसाठी योग्य आहे का याचा विचार करणे आवश्यक आहे. 

सोयाबीन या पिकाला युरिया (नायट्रोजन) या रासायनिक खतापेक्षा सल्फर, पालाश आणि फॉस्फेटयुक्त खताची जास्त गरज असते. पण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामळे युरिया या खताचा वापर वाढला आहे. 

गेल्या दोन महिन्याभरात जवळजवळ ३० गावांमध्ये प्रत्यक्ष भेट आणि फोनवर 'कृषी सहाय्यक' गावात खरिपाच्या मार्गदर्शनासाठी आले होते का? असे विचारले. फक्त चार गावाचा अपवाद वगळता इतर गावात कृषी सहाय्यक आले नाहीत, असे दिसून आले. त्यामुळे कृषी विभागाकडून खरीप पेरणीचे पुरेसे मार्गदर्शन करण्यात येत नाही.

परिणामी शेतकरी  कृषी सेवा केंद्राचे संचालक सांगतील त्यावर विश्वास ठेऊन पिकांना रासायनिक खतांचा डोस देत असल्याचे दिसून येते. कृषी संचालक जास्तीत जास्त रासायनिक खतांची विक्री व्हावी, म्हणून युरियाचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देतात. परिणामी युरियाचा वापर वाढलेला आहे, असा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT