Crop Fertilizer Management: पॉली फोर हे अनेक पोषकद्रव्ये असलेले खत पिकाला पोटॅशियम, सल्फर, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमचा पुरवठा करतं. तर साखर कारखान्यातील मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या राखेपासून बनवलेले पीडीएम हे खत एमओपी खताला एक उत्तम पालाशयुक्त खताचा पर्याय म्हणून वापरता येतं. या खतांशिवाय मल्टीन्यूट्रियंट फोर्टिफाइड खतांचे पर्यायही उपलब्ध आहेत. मल्टीन्यूट्रियंट फोर्टिफाइड खते म्हणजे विविध पोषक तत्त्वांचे मिश्रण असलेली खते. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असतो. विविध पोषक तत्त्वांच्या मिश्रणामुळे पिकांना संपूर्ण पोषण मिळते. पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढते. त्यामुळे पीक पोषणासाठी या विशेष खतांचा नक्की विचार करा आणि उत्पादन वाढवा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.