Goat Farming Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Sheli palan: गोट फार्मची अवस्था शेळीच्या शेपटासारखी का होते?

शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय असला म्हणून काय झाले,मालकाचे काळीज वाघाचे असायलाच पाहिजे.

Team Agrowon

शंकर बहिरट

Goat Farming लग्नाचं वय झालंय. मुलीकडचे ईचारत्यात पोरगा काय करतो. मोठ्ठा गहन प्रश्न ... मग सांगावं काय ? बापाला प्रश्न पडतो. दोनाचे चार हात तर झालेच पायजेल. त्यात आईला सुन मुख बघायची घाई. शेतीत (Agriculture) राम राह्यला न्हाई.

नोकरी तर मिळतच न्हाई. जिकडं जावं तिकडं नो वांटेड. आता कायतरी धंदा केल्या बिगर गत्यंतर न्हाई मोदीनं नोट बंदी (Demonetization) करून सगळा इस्कोट केला. कोरोना ने तर कहरच केला. समदे धंदेवाले मंदी मंदी म्हणत ईवळत्यात.

मग कुणीतरी सांगतो. सध्या गोट फार्मिंगची (Goat Farming) लय हवा हाये. म्हंजी बंदिस्त शेळी पालन! भारी व्यवसाय हाये! येका शेळीला तीन तीन कर्ड व्हत्यात.

कुणाच्या अध्यात ना मध्यात शेळ्या आपल्या गोठ्यात सुखरुप राहत्यात. मग करूयात की! मुलीकडच्यांनी इचारलं की पोरगा काय करतोय? तर सांगुया पोरगा गोट फार्मिंग करतोय.

तर हे असं आहे. गोट फार्म नावाच्या 'शेळपट' प्राण्यांच्या व्यवसायात.. 'बोकड कमाई' आहे असा आताच्या तरुणाई चा फाजील गैरसमज झाल्याने. सध्या ह्या व्यवसायात लोक 'मेंढरासारखे' उतरायला लागलेत. व्यवसाय म्हटला की बे दुणे चार झालेच पाहिजे.

नसेल होत तर समजून जा तुम्ही शेळपट आहात. शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय असला म्हणून काय झाले,मालकाचे काळीज वाघाचे असायलाच पाहिजे.

पण अशा बऱ्याच शेळपट लोकांनी मागचा पुढचा विचार न करता या व्यवसायात मेंढरासारख्या उड्या घेतल्या. आता व्यवसाय म्हटलं की अभ्यास करून पुरेपूर नियोजन नको का? चोवीस तास लक्ष आणि काबाडकष्ट नको का? पण त्या बिचाऱ्यांनी दादा कोंडकेंच गाणं ऐकलेलं... त्याला खायाला दिलं तर खातय नाय दिलं तर उपाशी राहतय

दिलं हाकलून माघारी येतंय काय बोलत नाय, काय मागत नाय जीव लावंतय मालकावरी ... मग काय... शेवटी व्हायचं तेच होणार. बें..बें... बें...च्या पुढे पाढा जातच नाही. दोनाचे चार हात तर झालेले असतात पण.. बे दुणे चार होतच नाही.

पावण्या रावळ्यात तोंड दाखवायला जागा रहात नाही. गोटफार्म ची अवस्था शेळीच्या शेपटा सारखी होते.इज्जत बी झाकत नाही आणि माश्या बी हाकलत नाही.

नुसते धंद्याला 'गोट फार्म' हे इंग्लिश नाव दिले म्हणून तुम्ही फार स्टँडर्ड झाले असा अर्थ होत नाही. त्या परास धनगर वाडा कैक पटींनी भारी असतोय...!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Policy : इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळतो; केंद्रीय मंत्री जोशींचा दावा

Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५७४ कोटींची मागणी

Kunbi community wedding reforms : साध्या लग्नसोहळ्याचा कुणबी बांधवांकडून आदर्श

Agriculture : अमेरिकेचे फूड बास्केट असलेल्या ‘या’ राज्यासोबत महाराष्ट्राचा करार, कृषीसह विविध क्षेत्रात एकत्र काम करणार

Farmers Protest : उद्योगांच्या नावाखाली सुपीक जमिनींची नासाडी

SCROLL FOR NEXT