Nandurbar Mirchi Market Agrowon
ॲग्रो विशेष

Byadgi Mirchi Karnataka : कर्नाटकमध्ये ब्याडगी मिरचीवरून का पेटलं रान?

काही शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाची तोडफोड केली. आणि बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचा एकच भडका उडाला. काहींनी बाजार समितीत उभी असलेली वाहनं पेटवली.

Dhananjay Sanap

एरव्ही खाद्यसंस्कृतीला तिखटपणा देणाऱ्या ब्याडगी मिरचीनं दोन दिवसांपूर्वी शेजारच्या कर्नाटक राज्यात मात्र आग लावली. ब्याडगीचे रातोरात भाव पडले. बाजारात मिरची घेऊन आलेल्या काही शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार समितीत जाळपोळ केली. त्यावरून राजकीय मैदानात सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर कर्नाटकची ब्याडगी मिरची चर्चेचा विषय ठरली.

ब्याडगी मिरची प्रकरण काय?

कर्नाटकमध्ये हावेरी नावाचा एका जिल्हा आहे. या जिल्ह्यात ब्याडगी नावाचं एक गाव आहे. याच भागात ब्याडगी मिरचीच उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. इथल्या मिरचीच नाव ब्याडगी पडलं ते या गावाच्या नावावरून. ब्याडगीत एक बाजार समितीत आहे. जिथं मोठ्या प्रमाणावर मिरचीची उलाढाल होत असते. २०११ च्या फेब्रुवारी महिन्यात या ब्याडगीच्या मिरचीला भौगोलिक मानांकन मिळालं. तेव्हापासून या उलाढालीत वाढच झाल्याचं व्यापारी सांगतात. सोमवारी बाजार समितीत लिलाव सुरू झाले त्यावेळी मिरचीला दर मिळत होता ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा. पण शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की, २० हजार रुपयांवर गेलेले भाव रातोरात ८ हजार रुपयांवर आले कसे? त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.

शेतकरी आक्रमक झाले

काही शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाची तोडफोड केली. आणि बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचा एकच भडका उडाला. काहींनी बाजार समितीत उभी असलेली वाहनं पेटवली. शेवटी पोलिसांनी जमाव पांगवला आणि अग्निशामन दलाला बोलवून पेटवलेली वाहनं विझवली. पण सोमवारी (ता.११) संध्याकाळपर्यंत बाजार समितीत तणावाची स्थिती होती.

भाव का पडले ?

२० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव उच्च गुणवत्तेच्या ब्याडगी मिरचीला मिळतोय. पण शेतकऱ्यांकडून येणारा माल उच्च गुणवत्तेचा नाही. त्यामुळे भाव कमी झालेत. दुसरीकडे ब्याडगी बाजारात आवाकही ३ लाख क्विंटलपर्यंत झाली होती. त्यामुळे भाव घसरले, असं व्यापारी सांगतात.

ब्याडगी मिरचीत डब्बी आणि कड्डी अशा दोन आकारानुसार जाती आहे. डब्बी त्यातली जाड मिरची. आणि कमी तिखट असूनही रंगासाठी मसाले उद्योगाकडून या मिरचीला मागणी असते. गेल्यावर्षी डब्बी मिरचीला हंगामाच्या सुरुवातीला ब्याडगी बाजारात प्रतिक्विंटल ४४ हजार रुपयांचा दर  मिळत होता. त्यामुळे बहुतांश भागात शेतकऱ्यांनी ब्याडगीच्या लागवडीला पसंती दिली. पण यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच प्रतिक्विंटल ३५ हजार रुपयांवर दर खाली आले. त्यामुळे शेतकरी हंगामाच्या सुरुवातीपासूनच नाराज होते.

यंदा गेल्यावर्षी सारखा भाव मिळणार नाही, असं व्यापारी सांगत होते. कारण गेल्यावर्षी अवकाळी पाऊस आणि किड रोगांच्या प्रादुर्भावानं उत्पादकता घटली होतीम, असंही व्यापारी सांगतात. पण शेतकरी म्हणतात यंदा दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे उत्पादकता कमीच आहे. पण व्यापाऱ्यांनी ठरवून दर पाडले, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत जाळपोळ केली.

राजकीय हस्तक्षेप ?

जाळपोळ झाल्यानंतर प्रकरण कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांच्याकडे गेलं. त्यांनी अधिकचा पोलिस फौजफाटा ब्याडगी बाजार समितीत तैनात केला. सरकार अशा प्रकरणाबाबत गंभीर असल्याचं सांगितलं. पण विरोध पक्षनेते आर अशोका यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, "सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा आणि दुष्काळी परिस्थितीचं व्यवस्थापनातील उदासीनतेचा हा थेट परिणाम आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे निराश आणि नाराज झाला आहे. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष दिलं असतं आणि योग्य वेळी पुरेशी दुष्काळी मदत दिली असती, तर शेतकऱ्यांनी बाजार समिती परिसराची तोडफोड करण्याचं पाऊल उचलले नसते." असंही अशोका म्हणतात.

तणाव निवळला!

ब्याडगीच्या बाजार समिती बेंचमार्क बाजार समिती आहे. त्यामुळे गुजरात, आंध्रप्रदेशमधील शेतकरीही या बाजारात मिरची विक्रीसाठी घेऊन येत असतात. सोमवारी झालेल्या जाळपोळीनंतर मात्र मंगळवारी (ता.१२) लिलाव पुन्हा सुरू झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं आणि व्यापारी बैठक घेतली. त्यानंतर मात्र तणाव निवळला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT