Animal Care  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

Fat Animal : बरीच जनावरे गाभण राहिल्यानंतर ५ ते ७ महिन्यांत अाटतात. दूध उत्पादन बंद झाल्यामुळे खाल्लेल्या अतिऊर्जायुक्त खाद्याचे फॅटमध्ये रूपांतर होऊन त्याचा शरीरात साठा होऊन अतिलठ्ठपणा येतो.

Team Agrowon

Livestock Management : बरीच जनावरे गाभण राहिल्यानंतर ५ ते ७ महिन्यांत अाटतात. दूध उत्पादन बंद झाल्यामुळे खाल्लेल्या अतिऊर्जायुक्त खाद्याचे फॅटमध्ये रूपांतर होऊन त्याचा शरीरात साठा होऊन अतिलठ्ठपणा येतो.

बऱ्याच शेतकऱ्यांकडे एक किंवा दोनच जनावरे असतात. अशा जनावरांना जास्त प्रमाणात फक्त गहू, मका, ज्वारी भरडून दिली जाते किंवा पीठ जास्त प्रमाणात दिले जाते. त्यामुळे जनावरे अतिलठ्ठ होण्याचं प्रमाण वाढतं. जनावर दिसायला सशक्त, गोल दिसते; पण त्याच्या उत्पादन क्षमतेवर, प्रजोत्पादनावर त्याचे अनिष्ट परिणाम होतात. विशेष करुन भाकडकाळ आणि दूध देण्याच्या शेवटच्या काळातील जास्त ऊर्जायुक्त अाहारामुळे जनावरांचे अतिपोषण होऊन लठ्ठपणा येतो. याच काळात अाहारातील प्रथिनांच्या कमी प्रमाणामुळे ही समस्या अजून वाढते.

जास्तीचे फॅट जनावर विल्यानंतर यकृताकडे जाते त्यामुळे यकृतामध्ये जास्तीचे फॅट जमा होऊन फॅटी लिव्हर सींड्रोम तयार होतो. त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता, ॲसिटोनेमीया तसेच विल्यानंतरच्या समस्यांमध्ये वाढ होते. उदा. कासदाह अाजार.

अतिलठ्ठपणाची लक्षणे

ज्या गायी गाभणकाळात किंवा वितेवेळी अतिलठ्ठ, जाड असतात त्यांच्यामध्ये विल्यानंतर कॅल्शिअमच्या कमतरतेची लक्षणे अढळतात. अशा प्रकारे उद्भवणाऱ्या कॅल्शिअमच्या कमतरतेमध्ये जनावर उपचारांना लवकर प्रतिसाद देत नाही.अतिलठ्ठ गायीमध्ये विल्यानंतर जास्त प्रमाणात भूक मंदावल्यामुळे कितनबाधाची लक्षणेसुद्धा उद्भवतात. कितनबाधेवर उपचार करूनही जनावराकडून सहजासहजी प्रतिसाद मिळत नाही.

काही जनावरांमध्ये दूध उत्पादन अचानक कमी होते. गर्भाशयदाह, कासदाह, लंगडणे यांसारख्या समस्याही जास्त प्रमाणात अाढळतात.विल्यानंतर ३ ते ४ अाठवड्यांमध्ये लगेच शरीरप्रकृती एकदम खालावते. त्यामुळे जनावरांमध्ये माजावर न येणे, मुका माज यासारख्या समस्याही उद्भवतात; तसेच दूध देण्याचा काळही कमी होतो.ही समस्या अतिपोषित गायींमध्ये पूर्ण कळपामध्ये असू शकते किंवा ज्या गायी प्रबळ अाहेत त्या दुसऱ्या गायींचाही जास्तीचा चारा खातात व त्या अतिलठ्ठ होतात.योग्य निदान होण्यासाठी रक्तातील शर्करा तपासणी, स्निग्ध अाम्लांचे प्रमाण तपासणे, लिव्हर बायोप्सी करून करता येते.

नियंत्रण

जनावरातील दूध देण्याच्या शेवटच्या टप्प्यात व भाकडकाळात ऊर्जेचे प्रमाण नियंत्रित करून संतुलित पशुखाद्य, अाहार द्यावा.सर्व जनावरांना वयानुसार, दूध उत्पादन काळ, गाभण काळ, भाकडकाळ यानुसार वेगवेगळे गट तयार करून शरीर गरजेनुसार संतुलित अाहार द्यावा.

माहिती आणि संशोधन - डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT