Team Agrowon
जनावरांना शिळे अन्न दिल्यामुळे रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये चयापचय म्हणजेच पचनाचे आजार होतात. काही वेळा रोगनिदान होतच नाही. त्यातच उपचार करण्यासाठी उशीर झाला तर या आजारामुळे जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो.
पोटातील जिवाणू जास्त आम्ल म्हणजेच अॅसीड तयार करतात. हे आम्ल शरीरात शोषले जाऊन जनावरांचा मृत्यू होतो.
आजारामुळे जनावरांचे दूध उत्पादन घटते. दुधातील फॅटच प्रमाण कमी होत. जनावर चारा पाणी कमी प्रमाणात खाते. मागील पायाने लंगडते, पातळ शेण टाकते.
शेणामध्ये बुडबुडे, फेस काही वेळा पोट, आतड्यातील खरवडलेली त्वचा, धान्याचे कण दिसू शकतात. जनावराच रवंथ करण्याच प्रमाण कमी होत. बऱ्याच वेळा या आजाराची तिव्रता कमी किंवा जास्त प्रमाणात असते.
शिळ्या अन्नामुळे जनावराच्या पोटाची हालचाल थांबते, भूक आणि दूध उत्पादन घटते. पोटातील जिवाणू जास्त आम्ल म्हणजेच अॅसीड तयार करतात. हे आम्ल शरीरात शोषले जाऊन जनावरांचा मृत्यू होतो.
तातडीने पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गरजेनुसार इंजेक्शन, सलाईन लावावे. जनावराची प्रकृती गंभीर असेल तर पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील सर्व खाल्लेले खाद्यान्न बाहेर काढून जनावराचा जीव वाचवावा लागतो.
सगळ्यात महत्वाच म्हणजे अन्न वाया जात म्हणून शिल्लक अन्न कोणत्याही परिस्थितीत जनावरांना खाऊ घालू नये. हाच या आजारावर प्रभावी उपाय आहे.