Politics  Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 : मतविभाजनाचा फायदा कोणाला?

Politics Update : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा या दोन लोकसभा मतदार संघांत यंदा चुरशीची लढत होत आहे. मतदार कुणालाही स्पष्ट कौल देत नसल्याने मतदानानंतर मतदारांची भूमिका स्पष्ट होईल.

Team Agrowon

Akola News : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा या दोन लोकसभा मतदार संघांत यंदा चुरशीची लढत होत आहे. मतदार कुणालाही स्पष्ट कौल देत नसल्याने मतदानानंतर मतदारांची भूमिका स्पष्ट होईल. तर दोन्ही मतदार संघात तिरंगी लढत होत असल्याने प्रस्थापित उमेदवारांची चिंता वाढली आहे. यापूर्वी सहज वाटणाऱ्या लढती चुरशीच्या बनत चालल्या आहेत.

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांत तिरंगी लढत होत आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपला होत आलेला आहे. यंदाची परिस्थिती वेगळी आहे.

भाजपने पुन्हा मराठा समाजाला प्राधान्य देत माजी मंत्री संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप यांना उमेदवारी दिली. अनुप राजकारणात अगदीच नवखा असून काँग्रेसनेही डॉ. अभय पाटील या मराठा उमेदवारास यंदा रिंगणात आणल्याने समाज मोठ्या प्रमाणात विभाजित होण्याची शक्यता राजकीय जाणकार मांडत आहे.

शिवाय वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर हे तिसरे तगडे उमेदवार आहेत. आंबेडकरांनी अकोला जिल्हयात विविध जाती, समाजातील उपेक्षित घटकांना एकत्र आणत उभा केलेला पॅटर्नही महत्त्वाचा ठरणार आहे. आंबेडकरांना यावेळी संधी मिळू शकते, असेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे यावेळच्या लढतीत काँग्रेस उमेदवार आहे, हे सर्वच मान्य करीत आहेत.

अकोला मतदार संघात मराठा मतदारांचे प्राबल्य आहे. याच समाजाचे दोन प्रमुख उमेदवार असून ॲड. आंबेडकर देखील मराठा समाजाच्या मतपेढीवर लक्ष ठेऊन आहेत. ओबीसी, मुस्लीम, दलित, माळी, धनगर, आदिवासी, बंजारा समाजाची मते कुणीकडे वळतात यावरही विजयाचे समीकरण अवलंबून आहे.

बुलडाणा लोकसभा बनली चुरशीची

सन २०१४, तसेच २०१९ च्या निवडणुकीत युतीच्या उमेदवाराने ज्या सहजपणे विजय मिळवला होता, ते दिवस आता राहलेले नाहीत, हे मतदार संघातील जनतेच्या प्रतिसादावरून दिसून येत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल वरिष्ठांपर्यंत पोचल्याने याठिकाणी शिवसेना (शिंदे) अधिक गांभिर्याने उतरली आहे.

मुख्यमंत्री सातत्याने या जिल्हयात फेऱ्या मारत आहेत. येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही मैदानात चुरस निर्माण केली आहे. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या खामगाव येथील सभेला प्रतिसाद मिळाला ते पाहता प्रस्थापितांच्या भुवया उंचावल्या आहेत. या मतदार संघात खरी कमाल रविकांत तुपकरांनी केली आहे.

अपक्ष असूनही गावागावातील त्यांच्या प्रचारसभा, रॅलीला हजारोंची गर्दी होत आहे. एकीकडे राजकीय पक्षांच्या सभांना सर्व सोयी देऊन नागरिकांना आणावे लागत आहे. तर दुसरीकडे तुपकरांच्या सभांना नागरिक स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहत आहेत. केवळ घाटावरील तालुक्यातच नाही तर घाटाखालील तालुक्यातही त्यांनी ‘माहौल’ तयार केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT