Crop Damage: राज्यात जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तब्बल ६८ लाख हेक्टर पीक नुकसान झाले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासोबतच कर्ज वसुलीस स्थगिती जाहीर केली आहे, ज्यामुळे २८२ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.