Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याकडून ३३०० रुपये प्रति टन पहिली उचल
Farmer Relief: उसाचा हंगाम सुरू असताना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वप्रथम उसाच्या पहिल्या हप्त्याची घोषणा केली आहे. एफआरपीपेक्षा १५ रुपये प्रतिटन अधिक देत ३३०० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.