loksabha election : राज्यात सहा ठिकाणी भरला उमेदवारांनी अर्ज

loksabha election 2024 : राज्यात जस जसे मतदानाचा दिवस जवळ येत आहे तस तसे राजकीय वातावरण जोर धरत आहे. आज राज्यातील सहा ठिकाणी महायुतीसह महाविकास आघाडीतील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon

Pune News : राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सोनवारी (ता.२२) रोजी सहा ठिकाणी महायुतीसह महाविकास आघाडीतील उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित राहतील. 

महायुतीकडून श्रीरंग बारणे, सुजय विखे, डॉ. हीना गावीतांसह सदाशिव लोखंडे आणि छत्रपती संभाजीनगरमधून महाविकासआघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

Loksabha Election
Kolhapur Loksabha Election 2024 : मंडलिकांच्यानंतर आता पुत्र वीरेंद्रचा हल्लाबोल; थेट साधला छत्रपती घराण्यावर निशाणा 

यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, सुजय विखे यांच्यासह शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. तर नंदुरबारमध्ये डॉ. हीना गावित यांच्यासाठी रॅली काढण्यात येणार आहे.

यावेळी बारणे यांच्यासह सुजय विखे यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच नंदुरबारमधून डॉ. हीना गावित यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुंवशी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी उपस्थित असतील. 

Loksabha Election
Loksabha Election 2024 : लोकशाहीचा उत्सव करूया यशस्वी

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. आज खैरे आपला उमेदवारी अर्ज आदित्य यांच्या उपस्थितीत भरणार असून भुमरे २५ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

यावेळी अहमदनगर येथे सुजय विखे यांचा उमेदवार अर्ज भरण्याआधी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी पवार नेहमीच निवडणुकीत विखे कुटुंबाविरोधात उमेदवार देतात. पण त्यांना यश येत नाही. यावेळी देखील सुजय विखे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com