Namo Shetkari Sanman Nidhi Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

NAMO Sanman Nidhi : नमो योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर १ हजार ७२० कोटींची रक्कम, कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला?, आकडेवारी पाहा...

Swapnil Shinde

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana : पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या पहिल्या हप्त्याची १७२० कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात केंद्राच्या पीएम किसान आणि राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून एकत्रित दरवर्षी १२ हजार रुपये जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिर्डी येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका क्लिकवर राज्यातील ८५ लाख ६० हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पाठवण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. आज नमो शेतकरी सन्मान योजनेतून खात्यावर पैसे जमा झाल्याचे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मॅसेज आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. नगरमधील ५ लाख १७ हजार ६११ शेतकऱ्यांना १०३ कोटी रुपये वितरित करण्यात आले.

त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ५४ हजार ४० शेतकऱ्यांना ९० कोटी ८१ लाख, तर कोल्हापूर जिल्ह्याला तिसऱ्या क्रमांकाचा निधी मिळाला आहे. तेथील ४ लाख ६ हजार २४० शेतकऱ्यांना ८१ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

तर सर्वात कमी निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला. ठाण्यातील ६८ हजार ३६७ शेतकर्‍यांना १३ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

जिल्हानिहाय शेतकऱ्यांचा मिळालेला निधी

अहमदनगर- 5 लाख १७ हजार ६११ शेतकऱ्यांना १०३ कोटी ५२ लाख

अकोला -१ लाख ८७ हजार ८१६ शेतकऱ्यांना ३७ हजार ५६ कोटी

अमरावती - २ लाख ६५ हजार ९१६ शेतकऱ्यांना 53.18 कोटी

संभाजीनगर (औरंगाबाद) - ३ लाख २६ हजार ८४० शेतकऱ्यांना ६५ कोटी ३७ लाख

बीड - ३ लाख ८९ हजार ५२७ शेतकर्‍यांना ७७ कोटी ९१ लाख

भंडारा - १ लाख ८६ हजार ३१ शेतकर्‍यांना ३७ कोटी २१ लाख

बुलढाणा - ३ लाख ३१ हजार ८९४ शेतकर्‍यांना ६६ कोटी ३८ लाख

चंद्रपूर - २ लाख १६ हजार ६१३ शेतकर्‍यांना ४३ कोटी ३२ लाख

धुळे - १ लाख ४२ हजार ४४१ शेतकर्‍यांना २८ कोटी ४० लाख

गडचिरोली १ लाख २९ हजार ६३९ शेतकर्‍यांना २५ कोटी ९३ लाख

गोंदिया - २ लाख १२ हजार ४१८ शेतकर्‍यांना ४२ कोटी ४८ लाख

हिंगोली - १ लाख ८० हजार ५७६ शेतकर्‍यांना ३६ कोटी १२ लाख

जळगाव - ३ लाख ७९ हजार ५४९ शेतकर्‍यांना ७५ कोटी ९१ लाख

जालना - २ लाख ८९ हजार ७७१ शेतकर्‍यांना ५७ कोटी ९५ लाख

कोल्हापूर - ४ लाख ६ हजार २४० शेतकर्‍यांना ८१ कोटी २५ लाख

लातूर २ लाख ६७ हजार ३०० शेतकर्‍यांना ५३ कोटी ४६ लाख

नागपूर १ लाख ५० हजार ४१४ शेतकर्‍यांना ३० कोटी ०८ लाख

नांदेड - ३ लाख ७७ हजार ४१५ शेतकर्‍यांना ७५ कोटी ४८ लाख

नंदुरबार - ९६ हजार ५८५ शेतकर्‍यांना २९ कोटी ३२ लाख

नाशिक - ३ लाख ८५ हजार ३४७ शेतकर्‍यांना ७७ कोटी ०७ लाख

धाराशिव (उस्मानाबाद)- २ लाख ११ हजार ४०९ शेतकर्‍यांना ४२ कोटी २८ लाख

पालघर - ८० हजार ३३६ शेतकर्‍यांना १६ कोटी ०७ लाख

परभणी - २ लाख ६७ हजार १०७ शेतकर्‍यांना ५३ कोटी ४२ लाख

पुणे - ३ लाख ८९ लाख ८४२ शेतकर्‍यांना ७७ कोटी ९७ कोटी

रायगड - ९८ हजार २६४ शेतकर्‍यांना १९ कोटी ६५ लाख

रत्नागिरी - १ लाख २७ हजार ६०० शेतकर्‍यांना २५ कोटी ५२ लाख

सांगली - ३ लाख ६७ हजार १७९ शेतकर्‍यांना ७३ कोटी ४४ लाख

सातारा - ३ लाख ९३ हजार ३३४ शेतकर्‍यांना ७८ कोटी ६७ लाख

सिंधुदुर्ग - १ लाख ८ हजार १०३ शेतकर्‍यांना २१ कोटी ६२ लाख

सोलापूर - ४ लाख ५४ हजार ४० शेतकर्‍यांना ९० कोटी ८१ लाख

ठाणे - ६८ हजार ३६७ शेतकर्‍यांना १३ कोटी ६७ लाख

वर्धा - १ लाख २३ हजार ३७६ शेतकर्‍यांना २४ कोटी ६८ कोटी

वाशिम - १ लाख ५४ हजार ०५२ शेतकर्‍यांना ३० कोटी ८१ लाख

यवतमाळ - २ लाख ७७ हजार १३० शेतकर्‍यांना ५५ कोटी ४३ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT