Radhakrishna Vikhe Patil : अकोल्यात पाणंद रस्त्यांची कामे असमाधानकारक : राधाकृष्ण विखे-पाटील यांची नाराजी

DPDC Meeting : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागप्रमुखांची सभा अकोला येथील नियोजन भवनात संपन्न झाली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilAgrowon
Published on
Updated on

Akola News : अकोला जिल्ह्यात पांदण रस्ते, शेतरस्ते निर्मितीबाबत दिलेले उद्दिष्ट ३० जुलैपर्यंत करणे अपेक्षित होते. मात्र आढावा घेतला असता पाहिजे तेवढे समाधानकारक काम झालेले नाही. या कामाला तातडीने गती देण्याचे निर्देश दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील विविध विकास कामे, योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. १६) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच विभागांची बैठक श्री. विखे पाटील यांनी घेतली. यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

Radhakrishna Vikhe Patil
Dhangar Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळला, धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला मारहाण

विखे पाटील म्हणाले, जलजीवन मिशनची कामे गावात सुरू आहेत याची माहिती गावकऱ्यांनाही नाही. त्यामुळे जेथे कामे होत आहेत, अशा ठिकाणी तातडीने फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत विदर्भ-मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांत दुग्ध व्यवसाय, पशू पूरक जोडधंदे वाढवण्याचा कृती कार्यक्रम राबवला जाणार आहे. जिल्ह्यातील शाळांना नवीन इमारती, डिजिटल शाळा, अंगणवाड्यांना वीजपुरवठा या बाबत आढावा घेतला. जेथे गरज आहे, अशा ठिकाणी प्राधान्याने वर्गखोल्या बांधकामाचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil
Banana Crop : अकोला जिल्ह्यातही केळी बागांत ‘सीएमव्ही’चा प्रादुर्भाव

वाळू डेपो महिनाभरात सुरू करा...

अवैध वाळू विक्रीला कठोरपणे पायबंद घालावा. नव्या वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच जिल्ह्यातील वाळू डेपो एक महिन्याच्या मुदतीत सुरू करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिले. ते येथे आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात कुठेही गौण खनिजाचा काळाबाजार होता कामा नये. अवैध वाळू तस्करी होत असेल तर ती तत्काळ मोडून काढावी. नव्या वाळू धोरणानुसार अनेक लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी. एक महिन्यात डेपो सुरू करण्यात यावेत. याप्रकरणी हयगय झाल्यास कारवाई करण्यात येईल, असाही इशारा त्यांनी दिला.

जमीन मोजणीच्या प्रलंबित दोन हजार ७०० प्रकरणांचा नोव्हेंबरअखेर निपटारा करावा. विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती देणारे फलक त्याठिकाणी लावावेत. नागरिकांना विकासकामांची माहिती मिळण्यासाठी तहसील कार्यालय, ग्रामपंचायत अशा ठिकाणी डिजिटल बोर्ड लावावेत, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com