Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : नदी प्रदूषणाचा प्रश्‍न सोडवितो म्हणणारे कोठे आहेत?

Politics Update : ‘‘लोकसभेला जशी साथ दिली, तशीच आगामी विधानसभेला साथ द्या. पाच महिन्यांनंतर आपले महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर तुमचा नीरा नदी प्रदूषणाचा प्रश्न कसा निकाली निघत नाही ते मी बघतो.

Team Agrowon

Pune News : ‘‘लोकसभेला जशी साथ दिली, तशीच आगामी विधानसभेला साथ द्या. पाच महिन्यांनंतर आपले महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर तुमचा नीरा नदी प्रदूषणाचा प्रश्न कसा निकाली निघत नाही ते मी बघतो. बारामतीमध्ये नदी प्रदूषणासारखे अनेक प्रश्न सोडवितो म्हणणारे मोठे मोठे पुढारी कोठे आहेत?

शेवटी सत्ता आल्यानंतर सामान्यांबरोबर शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवावा लागतो, परंतु या तालुक्यात सांगवी, खांडज, नीरावागज आदी नीरा नदीकाठच्या गावात तसे झाले नाही,’’ अशा कडक शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना नाव न घेता फटकारले.

लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना बारामतीकरांनी भरभरून मतदान केले, त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी (ता. १९) नीरा नदी काठच्या गावांना भेटी दिल्या व तेथील गावकऱ्यांचे आभार मानले. संवाद दौऱ्याच्या निमित्ताने पवार यांनी सांगवी, खांडज, नीरावागज आदी नदी काठच्या गावांमध्ये घेतलेल्या सभांमध्ये नदी प्रदुषणाचा मुद्दा चांगलाच लावून धरला व अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनाच धारेवर धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

या वेळी जगन्नाथ शेवाळे, सदाशिव सातव, सतीश खोमणे, एस. एन. जगताप, संदीप गुजर, अॅड. राजेंद्र काटे, श्रीहरी येळे, शरद तुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.नीरा वागजमध्ये पवार म्हणाले, ‘‘जमीन आणि पाण्याची उपलब्धता आपल्या प्रपंचासाठी महत्त्वाची आहे. परंतु येथे जमीनही खराब झाली आणि पाणीही.

या दोन्ही गोष्टी दुरुस्त करण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची आहे. मध्यतरी केंद्रातील मंत्री आले, पाहणी केली परंतु पुढे काहीही झाले नाही. केंद्रात आता सुप्रिया सुळे यांना खासदार म्हणून तुम्ही पाठविले, आता विधानसभा निवडणुकीतही आपल्याला बदल घडवायचा आहे. पाच महिन्यांनंतर आपले महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर तुमचा नीरा नदी प्रदूषणाचा प्रश्न कसा निकाली निघत नाही ते मी बघतो.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT