Maharashtra Politics : बच्चू कडू यांनी घेतली होती नवनीत राणा यांना पाडण्याची सुपारी : रवी राणा

Ravi Rana : अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या नवनीत राणा यांच्या पराभवासाठी अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी सुपारी घेतली होती, असा आरोप आमदार रवी राणा यांनी सोमवारी (ता. १७) केला.
Bacchu Kadu Vs Ravi Rana
Bacchu Kadu Vs Ravi RanaAgrowon
Published on
Updated on

Amravati Political News : अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या नवनीत राणा यांच्या पराभवासाठी अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी सुपारी घेतली होती, असा आरोप आमदार रवी राणा यांनी सोमवारी (ता. १७) केला. त्यामुळे आमदार राणा व आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटण्याचे संकेत आहेत.

‘प्रहार’चा उमेदवार रिंगणातून मागे घेण्यासाठी त्यांनी आपल्याशी सुद्धा डील करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूक लढविण्यासाठी त्यांना कुठून रसद मिळाली, याचे पुरावे आपल्याजवळ असून योग्य वेळी ते जनतेसमोर मांडू. विकासाला अडसर ठरलेल्यांना जनताच विधानसभा निवडणुकीत जागा दाखवेल, असे आमदार रवी राणा म्हणाले.

Bacchu Kadu Vs Ravi Rana
Indian Politics : संघाच्या नाराजीने फरक काय पडतो?

अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवानंतर आमदार राणा यांनी प्रथमच आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली. राणा म्हणाले, झालेला पराभव हा आमच्यासाठी धक्कादायक आहे. त्याचे आम्ही आत्मचिंतन करीत आहोत.

नवनीत राणा या जिल्ह्याच्या खासदार बनल्या असत्या तर कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागून अमरावतीचा विकासरथ अधिक गतीमान झाला असता. मात्र विकासाच्या आड आलेल्या स्वार्थी मंडळींनी विकासाचा घात केला.

Bacchu Kadu Vs Ravi Rana
Maharashtra Politics : शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संसद बंद पाडू; निलेश लंके यांचा एल्गार, सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नवनीत राणा यांचे काम केले नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, महायुतीच्या नेत्यांचे आम्ही आभारी आहोत. कुणी काम केले किंवा नाही केले, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे.

रवी राणा यांनी केलेल्या प्रत्येक आरोपावर आम्ही न्यायालयात दावा दाखल करू. रवी राणा यांनी वेळोवेळी इतरांवर केलेल्या वादग्रस्त विधानांचा (वाचाळपणा) फटका नवनीत राणा यांना बसला. त्यांच्या करणीमुळे ते पडले, मात्र खापर आमच्यावर फोडले जात आहे. त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नसून विधानसभा निवडणुकीच्या वेळीच आम्ही आमचे उत्तर देऊ.
बच्चू कडू, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com