Mango Pruning  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Pruning : आंबा बागेची छाटणी कधी व केंव्हा करावी?

Mango Orchard Management : बऱ्याच ठिकाणी घन पद्धतीने आंबा बागेची लागवड होते. काही ठिकाणी घन लागवड बागेचे योग्य व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे झाडे जीर्ण होतात आणि उत्पादनात घट येते. अशा जुन्या आंबा बागेची छाटणी करुण पुनरुज्जीवन करण गरजेच असतं.

Team Agrowon

Kesar Mango : बऱ्याच ठिकाणी घन पद्धतीने आंबा बागेची लागवड होते. काही ठिकाणी घन लागवड बागेचे योग्य व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे झाडे जीर्ण होतात आणि उत्पादनात घट येते. अशा जुन्या आंबा बागेची छाटणी करुण पुनरुज्जीवन करण गरजेच असतं.

२५ ते ३० वर्ष जुन्या, कमी उत्पादन देणाऱ्या घन पद्धतीने लागवड म्हणजे ५ बाय ५ मीटर अंतरावर लागवड केलेल्या केसर आंबा कलमांचे छाटणीद्वारे पुनरुज्जीवन करण्याचे तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे.

कोणत्या बागेची छाटणी करावी?

२० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कमी उत्पादन देणाऱ्या घन लागवड बागा.

फांद्या एकत्र झाल्यामुळे अपुरा सूर्यप्रकाश व हवा असणाऱ्या बागा.

खोड किडा, पर्णगुच्छ रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या बागा.

अशक्त झाडे व फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे अशा बागा.

योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक संरक्षण उपाययोजना झाले नाही अशा जुन्या बागा.

आंतरमशागत, काढणी करताना अडचण येत आहे अशा जुन्या बागा.

छाटणी कशी करावी?

छाटणी केल्यानंतर होणारा खोडकिड्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डिसेंबर महिन्यात कलमांची छाटणी करावी.

जमिनीपासून १.५ मीटर उंचीवर छाटणी करावी. कलमाचा जोड असलेल्या भागाच्या वर छाटणी राहील याची दक्षता घ्यावी, अन्यथा पुढील काळात खुंटामधून फुटवे येतील.

छाटणी करावयाची आहे त्या फांद्यांवर योग्य उंचीवर खूण करून घ्यावी. चेन सॉ, धारदार कोयत्याचा वापर करून छाटणी करावी.

छाटणी करताना काप तिरका, आतील बाजूस उतरता असावा. छाटणी करताना फांदी पिचणार नाही याची काळजी घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT