Fruit Crop Pruning : कशी करावी आवळा, सीताफळ, बोर फळबागेची छाटणी?

झाडाच्या काही फांद्या छाटल्याने उरलेल्या फांद्यांना व अवयंवांना झाडाच्या मुळ्यांनी जमिनीतून शोषून घेतलेल्या अन्न पुरवठ्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे काही फळझाडांची वेळेवर छाटणी करणे आवश्यक असते.
Fruit Crop Pruning
Fruit Crop Pruning Agrowon

फळबागेतील छाटणीमुळे (Fruit Crop Pruning) पाने, फांद्या यांची संख्या घटल्याने झाडाच्या एकूण वाढीवर परिणाम होतो. पानांची संख्या घटल्याने झाडाच्या अन्न तयार करण्याची क्षमता त्या प्रमाणात कमी होते.

त्याचप्रमाणे पानावाटे जी बाष्पीभवनाची क्रिया चालते ती काही प्रमाणात कमी होऊन झाडामधील पाण्याचा अंश वाढतो. त्यामुळे झाडातील पेशींचे विभाजन व त्याच्या संख्येत होणारी वाढ याचे प्रमाणही वाढते.

त्याचा परिणाम म्हणून सहाजिकच नवीन वाढ जोमात सुरु होते. झाडाच्या काही फांद्या छाटल्याने उरलेल्या फांद्यांना व अवयंवांना झाडाच्या मुळ्यांनी जमिनीतून शोषून घेतलेल्या अन्न पुरवठ्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे काही फळझाडांची वेळेवर छाटणी करणे आवश्यक असते.

यापैकी वसंतराव नाढीक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या आवळा, सीताफळ आणि बोर फळबागेतील छाटणीविषयी ची माहिती पाहुया.

आवळा

आवळ्याचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी झाडाला योग्य आकार द्यावा लागतो. आवळ्याच्या झाडाचे लाकूड अतिशय ठिसूळ असते. फांद्या फळांच्या वजनाने मोडतात त्यामुळे झाडाचा योग्य सांगाडा तयार होणे गरजेचे असते.

झाडाला योग्य आकार देण्यासाठी लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून झाडाला वळण द्यावे. त्यासाठी प्रथम जमिनीपासून ७५ ते १०० सेंमी उंचीपर्यंत सरळ एक मुख्य खोड वाढवून घ्यावे. नंतर त्यावर पुढे पाच ते सहा जोमदार फांद्या चहूबाजूंनी वाढू द्याव्यात.

चांगला सांगाडा तयार व्हावा यासाठी झाडावर आलेल्या इतर फांद्यांची छाटणी करावी. खोडावर एक मीटर खाली येणारी फूट सुद्धा काढून टाकावेी.

पावसाळा संपल्यानंतर रोगट आणि कमजोर वेड्या वाकड्या फांद्या काढून टाकाव्यात. मात्र दरवर्षी फळे देणाऱ्या झाडांची छाटणी करणे आवश्यक नाही. 

Fruit Crop Pruning
Fruit Crop Pruning : फळे, फुलझाडांची छाटणी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सीताफळ

सीताफळामध्ये पहिली छाटणी ही बाहाराचे पाणी सुरू करण्यापूर्वी १५ ते २० दिवस अगोदर केली जाते. उन्हाळी बहाराचे पाणी जानेवारी ते मे मध्ये सुरू करण्यात येते.

२५ ते २७ जून नंतर झाडांवर फळे असताना दुसरी छाटणी करावी. झाडांना आठ ते दहा दिवसात पांढरे येते त्यातूनच नवीन फुलांची निर्मिती होते.

ही फळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात काढणीस येतात. एका झाडापासून दोनदा फळे घेणे शक्य होते. 

बोर

बोर झाडाला फुटून येणाऱ्या फांद्या लांब किरकोळ आकाराच्या व वेड्यावाकड्या वाढणाऱ्या असतात. झाडे लहान असताना त्या फळांच्या भाराने मोडतात.

फांद्यांचा बळकट सांगाडा तयार करण्यासाठी वाढीच्या पहिल्या तीन ते चार वर्षाच्या काळात सर्व लांबलचक व नको असलेल्या फांद्या काढून टाकाव्यात.

त्यानंतर दरवर्षी झाडाची छाटणी करणे आवश्यक असते. छाटणी केल्याने फळांची संख्या वाढते व त्यांची प्रतही सुधारते. फळे काढून घेतल्यावर खरड छाटणी आणि मोहर येण्यापूर्वी हलकी छाटणी करतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com