Pune News : देशात महागाईचा वाढता आलेख, बाजारात पडलेले शेतमालाचे भाव यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. लोकसभा निवडणूका देखील काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महागाई आणि लोकसभा निवडणूका लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारकडून योजना आखल्या जात आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या मदतीने केंद्र सरकारने गहू बाजारात आणणार आहे.
वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राकडून बफर स्टॉकमधील गहू काढण्यात आला आहे. सुमारे ३००,००० टन गहू बाजारात आणला जाणार आहे. यासाठी केंद्राकडून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मदत घेतली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हा हा गहू तीन सरकारी एजन्सीकडे देण्यात येणार असून त्याचे रूपांतर पीठात केले जाणार आहे. तर गव्हाच्या पीठाची १० किलोच्या पॅकेटमध्ये माफक दरात विक्रीस उपलब्ध करून दिले जाणार आहे.
काय आहे सरकारची योजना?
अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या तीन एजन्सींच्या मदतीने सुमारे १००, ००० टन गव्हाचे पिठात रूपांतर केले आणि त्याची विक्री केली आहे.
ते म्हणाले की, जानेवारीमध्ये या तीन एजन्सींद्वारे ग्राहकांना पिठाच्या स्वरूपात सुमारे ३००,००० टन गहू देण्याची आमची तयारी आहे. तर यात १००,००० टन आणखी गहू भारतीय पिठाच्या रूपात ग्राहकांना पाठवला जाईल. तर ही योजना फेब्रुवारी-मार्चपर्यंत सुरू ठेवली जाईल असेही ते म्हणालेत.
सवलतीच्या दरात पीठ आणि गहू
महागाईवर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून भारत ब्रँडचे पीठ लोकांपर्यंत पोहचवले जात आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आतात पर्यंत नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या तीन एजन्सींना ३९०,००० टन गहू दिले असून ते २१.५ रूपये प्रतिकिलो प्रमाणे दिले आहे. तर या तीन एजन्सींनी ११६,६१७ टन पीठ ग्राहकांना २७.७ रूपये अशा सवलतीच्या दरात विकले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.