Sugar Industry : साखर कारखाना कर्मचाऱ्यांचा तिमाही महागाई भत्ता निश्‍चित

Sugar Factory Employee : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने साखर कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याचा आढावा घेतला आहे.
Sugar Mill
Sugar MillAgrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने साखर कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याचा आढावा घेतला आहे. पुढील तिमाहीसाठी आता महागाई भत्त्याची रक्कम ६१५९ रुपये ६० पैसे निश्‍चित करण्यात आली आहे.

साखर संघाने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पाठवलेल्या पत्रात सुधारित महागाई भत्त्यानुसार कार्यवाही करण्यास सूचित केले आहे. डेक्कन शुगर फॅक्टरीज असोसिएशन, साखर संघ व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांच्यात १९८० मध्ये झालेल्या करारानुसार साखर कारखाना कामगारांच्या महागाई भत्त्याचा नियमित आढावा घ्यावा लागतो.

Sugar Mill
Sugar Rate : देशात सध्या साखरेचे दर स्थिर; ऑक्‍टोंबरमध्ये दरवाढीची शक्‍यता

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पुढाकारातून १९७९ रोजी झालेल्या निवाड्यानुसार करारनाम्याची संकल्पना स्वीकारली गेली आहे. बदलणाऱ्या महागाई भत्त्यानुसार दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यासाठी साखर संघाने सूत्र निश्‍चित केले आहे. या सूत्राच्या आधारे महागाई भत्त्याची रक्कम निश्‍चित केली जाते.

Sugar Mill
Sugar Market : ऑक्टोबरचा साखर कोटा दहा दिवस आधीच जाहीर

राज्य पातळीवर साखर कामगारांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या करारानुसार सुधारित दराने महागाई भत्ता देण्याबाबत संघाकडून साखर कारखान्यांना कळविले जाते. जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी सरासरी निर्देशांक १८९२ अंशाकरिता महागाई ५५४८०.८० रुपये देण्यात येतो आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी सरासरी निर्देशांक २१२४ अंश येतो. २०२१ मधील करारानुसार २१२४ अंशासाठी प्रतिअंश २.९० रुपयांप्रमाणे महागाई भत्ता ५१५९.६० रुपये येतो, असे संघाचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com