Wheat Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : खानदेशात गव्हाची २४ हजार हेक्टरवर पेरणी शक्य

Rabi Sowing : रब्बीसाठी आता शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. १५ डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी केली जाते. ही पेरणी यंदा स्थिर राहणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पावसाळी वातावरण आहे. यामुळे मशागतीसह पेरणीलाही गती कमी आहे. परंतु रब्बी हंगाम जोमात राहणार असून, गव्हाची पेरणी खानदेशात २३ ते २५ हजार हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत.

रब्बीसाठी आता शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. १५ डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी केली जाते. ही पेरणी यंदा स्थिर राहणार आहे.. कारण जलसाठे मुबलक आहेत. गव्हाचे दर गेल्या वर्षी टिकून होते. काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर व कमी खर्चात येणाऱ्या पिकांना पसंती देण्याचे नियोजन केले आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे १६ ते १७ हजार हेक्टरवर गहू पेरणी होईल. तर धुळे व नंदुरबारात मिळून सात ते साडेसात हजार हेक्टरवर गहू पेरणी होईल. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धुळ्यात शिरपूर, नंदुरबारात शहादा, तळोदा तालुक्यात गव्हाची अधिकची पेरणी यंदा होईल. पेरणीसाठी शेतकरी संकरित, घरात साठविलेल्या बियाण्यांचा वापर करतील. कारण बियाण्यावर खर्च कमी केल्यास पुढे नफा वाढविता येतो.

काळ्या कसदार जमिनीत गहू पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. तापी, गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रात पेरणी अधिक होईल. चांगला पाऊस असल्याने पुढे थंडी वाढेल, असे संकेत आहेत. यामुळे गहू पेरणीला वेग येईल, अशी अपेक्षा आहे. कापूस, जुनारी किंवा काढणी पूर्ण झालेली केळी, सोयाबीन आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात गहू पेरणी होईल. यंदा पेरणी बऱ्यापैकी होणार असल्याने बियाण्यासही उठाव राहणार आहे.

खानदेशात रब्बी पिकांत गव्हाची पेरणी सर्वात कमी केली जाते. हरभऱ्याची पेरणी अधिक असचे. कमी पाणी व कमी खर्चात येणारे, चांगले बेवड देणारे पीक म्हणून हरभरा पिकाची पेरणी खानदेशात फारशी कमी होत नाही. मागील हंगामातही खानदेशात हरभऱ्याची पेरणी सुमारे सव्वादोन लाख हेक्टरवर झाली होती. तर मागील हंगामात गव्हाची सुमारे २१ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदाची पेरणी २३ ते २४ हजार हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत.

यंदाची पेरणी उशिरा

खानदेशात यंदा कमाल शेतकरी कापूस पिकाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात गव्हाची पेरणी करणार आहेत. बागायती किंवा पूर्वहंगामी कापूस पिकात नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत वेचणी सुरू असते. काही शेतकऱ्यांच्या पिकात वेचणीला उशीर होईल. कारण पाऊस सुरू आहे. यामुळे कापूस पीक काढून क्षेत्र रिकामे करण्यास विलंब लागणार आहे. परिणामी यंदा पेरणी उशिरा होणार आहे. काही शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत पेरणीचे नियोजनही केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT