CM Tirthdarshan Scheme agrowon
ॲग्रो विशेष

CM Tirthdarshan Scheme : 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' म्हणजे काय? नेमका कोणाला होणार लाभ

sandeep Shirguppe

Tirthdarshan Yojana : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना राज्य व देशातील तीर्थ स्थळांना जाऊन मन:शांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राबविण्यात येत आहे.

तीर्थदर्शन योजनेत राज्य व देशातील सर्व धर्मीयांतील देवस्थान, चर्च, दर्गासह १०५ क्षेत्रांचा समावेश आहे. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना प्रतिव्यक्ती ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास व्यवस्था खर्चाचा समावेश आहे. तसेच विभागाने ठरवून दिलेल्या निकष, सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील, तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित ज्येष्ठ नागरिकाची राहील.

अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. पात्र ज्येष्ठ नागरिकांस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. अर्जदाराने स्वत: उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरुन त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल. यासाठी अर्जदाराने कुटुंबाचे रेशनकार्ड व स्वत:चे आधारकार्ड आणणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड / रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला (त्याऐवजी १५ वर्षापुर्वीचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही प्रमाणपत्र, ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल.) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे, केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक, योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेकरीता जिल्हास्तरीय समिती ही पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे. समिती अर्जांची छाननी करुन पात्र व्यक्तीची निवड करणार आहे. जिल्ह्याच्या दिलेल्या पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या कोट्यापेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरीद्वारे पात्र यात्रेकरुंची निवड होणार आहे.

तीर्थ दर्शन प्रवासासाठी रेल्वे, बस किंवा टुरिस्ट एजन्सी कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे. संबंधित प्रवासी एजन्सी कंपनी या तीर्थ यात्रेचे नियोजन करणार आहेत. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून यासाठी लवकरच पोर्टल सुरु होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Udgir APMC : शेतकरी म्हणून निवडून आलेले सभापती हुडेंसह पाच जण अपात्र

Irrigation Scheme : बेलकुंड उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी

Crop Damage Survey : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण

Grape Pruning : सांगली जिल्ह्यात द्राक्षफळ छाटणीची तयारी सुरू

E-Peek Pahani : ई-पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट; ई-पीक पाहणीसाठी आठ दिवसांची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT