Namo Shetkari Sanman : पीएम किसानची कॉपी, नमो शेतकरी सन्मानपासून हजारे शेतकरी वंचीत, लाखो रूपये अडकले

Maharashtra Schemes : चौथा हप्ता जुलैअखेर मिळण्याची शक्यता असताना शेतकरी मागील हप्ता मिळण्यासाठी कृषी खात्याकडे हेलपाटे मारत आहेत.
Namo Shetkari Sanman
Namo Shetkari Sanmanagrowon
Published on
Updated on

PM Kisan Scheme : केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेला कॉपी करत राज्य सरकारनेही पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. परंतु या योजनेचा अद्यापही हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांना ३ हप्ते मिळाले आहेत मात्र, काही शेतकऱ्यांची झिरो बॅलन्स बँक खाते बंद अवस्थेत असल्याने जिल्ह्यातील सतरा हजार शेतकऱ्यांना तिन्ही हप्त्यांचा लाखो रुपये निधीचा लाभ मिळालेला नाही. चौथा हप्ता जुलैअखेर मिळण्याची शक्यता असताना शेतकरी मागील हप्ता मिळण्यासाठी कृषी खात्याकडे हेलपाटे मारत आहेत.

याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक अजय कुलकर्णी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बँका खात्यांची तपासणी सुरू आहे. महसूल तहसीलदार कार्यालयाकडून व बँकेकडून याचा पाठपुरावा सुरू आहे. या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर बँक खाते सुरू करून आम्ही त्यांना लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात असल्याची त्यांनी माहिती दिली.

'पीएम किसान' योजनेतून केंद्र शासनाचे सहा हजार व राज्य सरकारतर्फे नमो शेतकरी महासन्मान निधीचे सहा हजार, असे १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. 'पीएम किसान'चा एप्रिल ते जुलै २०२३ मध्ये १४ व्या हप्त्यावेळी राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते जमा झाले.

यामध्ये 'पीएम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये भूमिअभिलेख खात्यानुसार नोंदी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या चार लाख ८९ हजार २७१, भूमिअभिलेख नोंदणी व पीएफएमएस (वित्त प्रणाली) झालेल्या शेतकऱ्यांची संख्या चार लाख ७५ हजार २६९, ई-केवायसी, भूमिअभिलेख व आधार संलग्न या तिन्ही बाबी पूर्ण झालेल्या शेतकरी खातेदारांची संख्या चार लाख ७० हजार ३१७ इतकी आहे.

Namo Shetkari Sanman
PM Kisan Subsidy : आंदोलन कृषी अधिकाऱ्यांचे; हाल शेतकऱ्यांचे, पीएम किसानचे काम ठप्प झाल्याने अनुदानाची प्रतिक्षा

पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जिल्ह्यातील चार लाख ९३ हजार २४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजनेतील अनेक शेतकरी लाभाथ्यर्थ्यांचे यूआयडी जुळत नाहीत. बँक खाती बंद आहेत. यामुळे पहिल्या हप्त्यातील २०५७ शेतकऱ्यांमध्ये यूआयडी न जुळलेले, तर यामध्ये बँक खाते बंद असलेल्या ८ हजार ६७० शेतकऱ्यांचा समावेश आहे.

दुसऱ्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये ३०४ यूआयडी जुळत नाहीत. ४ हजार ४५३ शेतकऱ्यांचे बँक खाते बंद आहे. तिसऱ्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये ४२३ यूआयडी जुळत नाहीत, तर ४ हजार ४४५ शेतकऱ्यांची बँक खाते बंद आहे या सर्व बाबींमुळे तिन्ही हफ्त्यांच्या २० हजार ३५२ शेतकऱ्यांना लाभ देता आलेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com