Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking Wages : ओल्या कापसामुळे वेचणीची मजुरी महागली

Cotton Picking Season : मॉन्सूनोत्तर पावसामुळे बोंडातील कापूस भिजला आहे. परिणामी वेचणीस हा कापूस त्रासदायक ठरत असल्याने मजुरांकडून या कापसाच्या वेचणीसाठी प्रती किलो ११ ते १२ रुपयांची मागणी होत आहे.

Team Agrowon

Amravati News : मॉन्सूनोत्तर पावसामुळे बोंडातील कापूस भिजला आहे. परिणामी वेचणीस हा कापूस त्रासदायक ठरत असल्याने मजुरांकडून या कापसाच्या वेचणीसाठी प्रती किलो ११ ते १२ रुपयांची मागणी होत आहे.

दुसरीकडे कापसाचे दर सहा हजारांवर स्थिरावल्याने या वाढलेल्या उत्पादकता खर्चाची भरपाई कशी होणार, या विवंचनेत शेतकरी आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका कापूस उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे बोंडात परिपक्‍व अवस्थेतील कापूस भिजला त्याच्या परिणामी असा कापूस वेचणीत अडचणी निर्माण होतात.

त्यामुळे मजुरांकडून वाढीव पैशाची मागणी केली जात आहे. पावसाने भिजलेला कापूस बोंडातच चिकटून राहत असल्याने तो सहज निघत नाही. दोनदा काढावा लागतो, त्यात श्रम खर्ची होत असल्याने मजुरी दर वाढवून हवा, असा मजुरांचा आग्रह आहे.

मजुरांकडून होणाऱ्या वाढीव मजुरी दराच्या मागणीमुळे शेतकरी मात्र हवालदील झाले आहेत. चांदूरबाजार तालुक्‍यात कापूस वेचणी दर ११ ते १२ रुपये प्रती किलोवर पोचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे बाजारात कापसाला कमी दर आहेत. सहा हजार ते ६०२० रुपयांनी कापसाचे व्यवहार होत आहेत. उत्पादकता खर्च वाढता आणि दर कमी अशी अडकित्त्यात सापडल्यागत शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे.

आमच्या तालुक्‍यात १८ हजार ९९२ हेक्‍टरवर कापसाची लागवड आहे. मॉन्सूनोत्तर पावसामुळे पीक भिजले. बोंडातील कापूस वेचणी अडचणीची ठरत असल्याने मजुरांकडून वाढीव मजुरीची मागणी केली जात आहे. ११ ते १२ रुपये प्रती किलो असा दर असल्याने हा शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
सतीश मोहोड, शेतकरी, माधान, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT