Maize Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Weed Management: मका पिकातील तण व्यवस्थापन

Maize Weed Control: मका पिकात प्रभावी तणनियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. मका पिकासाठी उपलब्ध तणनाशकांचा योग्य मात्रेत, योग्य वेळी वापर करावा.

Team Agrowon

डॉ. व्ही. व्ही. गौड

मका पिकाची लागवड तिनही हंगामात केली जाते. मात्र सर्वाधिक लागवड खरीप आणि रब्बी हंगामात होते. मका उत्पादनात घट होण्यामागे विविध जैविक आणि अजैविक घटकांचा समावेश होतो. त्यापैकी तण हा मका पिकाच्या उत्पादनात घट होण्यासाठी प्रमुख घटक आहे. वाढीच्या अवस्थेत मका पिकाची तणासोबत अन्नद्रव्ये आणि पाण्यासाठी स्पर्धा होते. ही स्पर्धा कमी करण्यासाठी विविध तंत्राचा वापर करून तण नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यात जोडओळ पद्धतीने लागवड, अति घन लागवड, तण दडपण्याची क्षमता असलेल्या स्पर्धात्मक वाणांचा वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर, योग्य सिंचन पद्धतीचा अवलंब व डवरणी यासारख्या तंत्रांचा समावेश होतो. प्रभावी तणनियंत्रणासाठी एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. मका पिकासाठी विविध तणनाशके उपलब्ध असून, त्यांचा योग्य मात्रेत आणि योग्य वेळी वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

तणनाशक फवारणीवेळी घ्यावयाची काळजी

तणनाशकासोबतच्या लेबलवरील माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी.

योग्य तणनाशकाची फवारणी शिफारशीत मात्रेत आणि योग्य वेळेनुसार करावी.

उगवणपूर्व तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळेरहित व सपाट जमिनीवर पुरेसा ओलावा असताना करावी.

उगवणपूर्व तणनाशक फवारणीनंतर, तणांची उगवण होईपर्यंत डवरणी करू नये.

उगवणपश्‍चात तणनाशकाची ढगाळ, पावसाळी वातावरण, धुके किंवा पाऊस असताना तसेच कडक उन्हात फवारणी करणे टाळावे.

उथळ जमिनीत (हलक्या) शिफारशीत कमी मात्रा आणि भारी जमिनीत शिफारशीत जास्त मात्रेचा वापर करावा.

फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे.

उगवणपूर्व तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति एकर २०० लिटर, तर उगवणपश्‍चात प्रति एकर १५० लिटर पाण्याचा वापर करावा.

तणनाशक फवारणीसाठी स्वतंत्र पंप ठेवावा. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे.

दोन भिन्न तणनाशके अथवा तणनाशकांसोबत इतर कोणतेही कृषी रसायन मिसळून फवारणी करू नये.

तणनाशक द्रावण तयार केल्यानंतर ताबडतोब फवारणी करावी. ​​फवारणीस उशीर होणार असेल, तर तणनाशक तळाशी बसू नये म्हणून द्रावण ढवळून किंवा फवारणी यंत्र पूर्णपणे हलवून घ्यावे.

तणनाशक आणि कीटकनाशक फवारणीसाठी वेगळे फवारणी यंत्र वापरणे आवश्यक आहे.

तणनाशक फवारणी करताना शेजारच्या शेतातील इतर पिकांवर द्रावण उडणार नाही याची दक्षता घ्यावी.

वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये.

प्रत्येक फवारणीनंतर स्प्रेअर धुवून घ्यावा.

तणनाशकांची हाताळणी काळजीपूर्वक करावी. लहान मुले आणि अन्नपदार्थांपासून दूर ठेवावीत.

फवारणीवेळी गम बूट, हातमोजे, गॉगल्स आणि मास्क यांचा वापर करावा.

तणनाशक वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

तणनाशक अंश व्यवस्थापनासंबंधी उपाय

तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा अतिवापर केल्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. वारंवार तणनाशक वापरामुळे तणनाशक अंश वाढीची शक्यता असते. जमिनीमध्ये तणनाशक अंशाचे प्रमाण वाढू नये यासाठी उपाययोजना कराव्यात.

शिफारशीत मात्रेत तणनाशके वापरावीत.

एकच तणनाशक सतत वापरू नये.

पिकांची फेरपालट केल्यास पर्यायाने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होतो.

Chart

सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीतील तणनाशकांचे अंश धरून ठेवले जातात. तसेच सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते. त्यामुळे तणनाशकाचे विघटन होण्यास मदत होते.

खोल नांगरट केल्यास जमिनीच्या थरांची उलथापालथ होते. जमिनीच्या वरील जास्त अंश असलेला थर मशागतीमुळे खोल जातो आणि तणनाशकाच्या अंशाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही.

- डॉ. व्ही. व्ही. गौड, ८६३७७०७६४५

(प्रमुख अन्वेषक, अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT