Brinjal Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Brinjal Farming : कापडणेतील वांगी बनली सुरत बाजारात ब्रॅन्ड

Vegetable Market : रमेश माळी हे उन्हाळी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. रमेश माळी यांनी उन्हाळी वांगी व चवळीची लागवड केली आहे. दोन्हीही भाजीपाल्याची काढणी सुरु आहे.

Team Agrowon

Dhule News : सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. लग्नसराईमुळे वांगी व टोमॅटोची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वांगी धुळे व सुरतच्या बाजारात शेतकऱ्‍यांकडून प्रतिकिलो दहा ते पंधराने खरेदी होत आहेत.

गेल्या वर्षी हेच भाव पंधरा ते वीसपर्यंत होते. कमी भाव असूनही वांगी उत्पादन परवडत असल्याचे माळी कुटूंबीय सांगतात. सुरतच्या बाजारात त्यांच्या वांग्यांचा स्पेशल ब्रॅंड तयार झाला आहे. कुटुंबातील दहाजण शेतात राबत असल्याने भाजीपाला परवडत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

रमेश माळी हे उन्हाळी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. रमेश माळी यांनी उन्हाळी वांगी व चवळीची लागवड केली आहे. दोन्हीही भाजीपाल्याची काढणी सुरु आहे. दररोज पंधरा ते वीस मजूरांकडून ही कामे सुरु आहेत. दररोज एक क्विंटल वांगी सुरतच्या बाजारात विक्रीसाठी पाठवित आहेत. सुरतला भल्या पहाटे त्यांची वांगी पोहचल्यानंतरच लिलाव सुरू होतो, हे विशेष.

लग्नसराईमुळे वांग्यांची मागणी बऱ्‍यापैकी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत अधिकची वांगी निघत असल्याने भाव स्थिर असल्याचे उत्पादक माळी यांनी सांगितले. घाऊक बाजारात प्रतिकिलोचे भाव बाराच्या आत आहेत.

तर किरकोळ बाजारात तीसपर्यंत आहेत. वांगी उत्पादनात नगदी चलन हाताशी खेळत राहते. दहापेक्षा अधिक भाव असल्यास वांगी हमखास परवडते. माळी कुटुंबीय वांगी, टोमॅटो, चवळी व बोर उत्पादनातून आर्थिक स्थिरस्थावर झाले आहेत.

वांगी काढणीसाठी अधिक मजूर लागतात. घरातील दहाही सदस्य राबतात. म्हणूनच भाजीपाला अधिकचा परवडतो.
- रमेश माळी, वांगी उत्पादक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT