Team Agrowon
महाराष्ट्रात वांगी पिकाच्या बऱ्याच जातींची लागवड केली जाते. वेगवेगळया विभागात रंग व आकारानुसार तसेच काटेरी व बिनकाटेरी अशा विविध जातींची लागवड केली जाते.
जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते वापरल्यास उत्पादन वाढीस फायदा होतो.
जमिनीचा सामू ५.५ ते ६.६ असल्यास पिकाची वाढ उत्तम होते. खरीप हंगामासाठी रोपवाटिकेत बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची पुनर्लागवड जुलै-ऑगस्टमध्ये करावी.
कमी वाढणाऱ्या, सरळ जातीसाठी हेक्टरी ४०० ते ५०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते.
संकरित, जास्त वाढणाऱ्या जातीसाठी हेक्टरी १२० ते १५० ग्रॅम बियाणे पुरेसे होते.
प्रति किलो बियाण्यास थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
सुपीक, मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार जमिनीमध्ये वांगी पिकाचे चांगले उत्पादन मिळते.