Automated Weather Station Agrowon
ॲग्रो विशेष

Automated Weather Station : स्वयंचलित हवामान केंद्र शेतीसाठी दिशादर्शक

Climate Change : गेल्या काही वर्षांत हवामानातील अस्थिरता आणि अनिश्चिततेमुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे.

Team Agrowon

Palghar News : गेल्या काही वर्षांत हवामानातील अस्थिरता आणि अनिश्चिततेमुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. अनियमित पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, तापमानातील चढ-उतार आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी स्मार्टफोनचा वापर करून स्मार्ट शेतीकडे वळत आहे. त्यामुळे हवामान बदलाचा सामना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने करणे गरजेचे आहे. यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणे ही काळाची गरज बनली आहे.

२३ मार्च हा जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. भारतीय हवामान विभागाने कोसबाड हिलमधील कृषी विज्ञान केंद्र येथे ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र सुरू केले आहे. येथे पालघर जिल्ह्यातील एकमेव स्वयंचलित हवामान केंद्र असून, हे केंद्र दर १५ मिनिटांनी नोंद घेते.

हवामान बदल आणि त्याचा कृषी, जलसंपदा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात, हवामान अंदाज आणि त्यानुसार योग्य उपाययोजना आखणे महत्त्वाचे ठरते, पण आज ग्रामविकास आराखडा आखताना हवामान घटकाला जास्त महत्त्व दिले जात नाही.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी मदत

हवामानाचा अचूक अंदाज मिळाल्यास शेतकरी पेरणी, सिंचन, काढणीसाठी योग्य वेळ निवडू शकतील. त्यामुळे पिकाचे नुकसान कमी होईल.

हवामान बदलांमुळे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे हवामान आकडेवारीच्या आधारे योग्य वेळी फवारणी करता येते.

पूर, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या जोखमीचा अंदाज घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात. त्यामुळे जीव व वित्तहानी टाळता येते

पावसाचे अचूक मापन झाल्यास जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणासाठी योग्य नियोजन करता येते.

मोबाईल अ‍ॅप, एसएमएस किंवा व्हॉइस मेसेजद्वारे हवामानाची माहिती वेळेवर मिळू शकते.

स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे काय?

स्वयंचलित हवामान केंद्र हे संवेदक, डेटा लॉगरच्या साह्याने हवामानाच्या विविध घटकांचे सतत निरीक्षण करणारे उपकरण आहे. हे केंद्र तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग आणि दिशा, वायुदाब, मातीतील ओलावा, तापमान आदी नोंद करते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Department Action: कांदळवन कारवाईवर संशय

Milk Adulteration: ‘एफडीए’च्या कारवाईने दुग्ध व्यवसायात खळबळ

Women In Agriculture: ससून नवघरच्या डोंगरावर बहरली फळबाग

Village Road: पंचवीस वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद मिटला

Tur Crop Insurance: चौदा मंडलामध्ये तुरीचा २२ कोटी १३ लाख रुपये पीकविमा परतावा देय

SCROLL FOR NEXT