Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : संत्रा, आंबा, डाळिंबास हवामानाधारित फळपीक विमा योजना लागू

Crop Insurance Scheme : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिकविमा योजना परभणी जिल्ह्यातील (आंबिया बहर) आंबा, संत्रा, डाळिंब, केळी, पपई, मोसंबी या फळपिकांना लागू आहे.

Team Agrowon

Parbhani News : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिकविमा योजना परभणी जिल्ह्यातील (आंबिया बहर) आंबा, संत्रा, डाळिंब, केळी, पपई, मोसंबी या फळपिकांना लागू आहे. संत्रा फळपिकाच्या विमा प्रस्तावासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत, तर आंबा फळपिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर, तर डाळिंबाचे विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी १४ जानेवारीपर्यंत मुदत आहे.

परभणी जिल्ह्यात यंदा पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिकविमा योजना युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शूरन्स कंपनी मार्फत राबविली जात आहे. या योजनेत हवामान धोके कमी पाऊस, पावसाचा खंड, पावसाचा खंड व जास्त तापमान, जास्त आर्द्रता व जास्त पाऊस, पाऊस, आर्द्रता, किमान तापमान, अतिरिक्त प्रीमियमसह गारपीट धोका या बाबीसाठी विमा संरक्षण असते.

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. याअंतर्गत ३५ टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी ५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. केळी, पपई, मोसंबीचे विमा प्रस्ताव सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत होती. संत्रा, आंबा, डाळिंब फळपिकांसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आणि बँकांनी प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.

विमा हप्ता संत्र्यासाठी हेक्टरी ५ हजार रुपये, आंबा फळासाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये, डाळिंबासाठी हेक्टरी ८ हजार रुपये आहे. गारपीटसाठी विमा हप्ता संत्र्यांसाठी १ हजार ६५० रुपये, आंब्यांसाठी हेक्टरी २ हजार ८५० रुपये, डाळिंबासाठी २ हजार ६५० रुपये आहे.

विमा प्रस्तावासाठी आधार कार्ड, चालू वर्षाचा फळपिकाची नोंद असलेला ७-१२ उतारा, स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक, जिओ टॅगिंग केलेल्या फळांच्या पिकांचे छायाचित्र आवश्यक आहे. भाडेतत्त्वावर शेती असल्यास नोंदणीकृत भाडेकरार प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.

एका शेतकऱ्यास ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल. दाव्याचे मूल्यमापन व समझोता हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या हवामानाच्या आकडेवारीचा वापर होईल. या योजनेत सहभागी शेतकऱ्यांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीत ओलाव्याचा निकष १२ वरून १५ टक्क्यांवर

Farmer Issue : संमतिपत्राविना २४ लाख शेतकरी मदतीपासून वंचित

Maharashtra Winter Weather : तापमानात चढ-उतार शक्य

Marathwada Water Grid Project : मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुनरुज्जीवित करू

Soybean Procurement : पोर्टल बंद केल्याने रखडली सोयाबीन नोंदणी

SCROLL FOR NEXT