Uddhav Thackeray Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : ‘स्वावलंबी, स्वाभिमानी महाराष्ट्र उभारणार’

Uddhav Thackeray : आम्ही निवडून आलो तर स्वावलंबी आणि स्वाभिमानी महाराष्ट्र उभारू, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

Team Agrowon

Buldana News : आम्ही निवडून आलो तर स्वावलंबी आणि स्वाभिमानी महाराष्ट्र उभारू, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ बुलडाण्यात शुक्रवारी (ता. ८) झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

या सभेत ठाकरे यांनी सातत्याने महायुतीवर कडाडून टीका केली. ठाकरे म्हणाले, ‘‘लोकसभेत मोदींना राज्याने जागा दाखवली आहे. आता विधानसभेत त्याहीपेक्षा अधिक दाखवून देऊ. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही यांच्यात आहे. जे छत्रपतींचा झेंडा घेऊन मिरवत आहेत, ते प्रत्येक जण छत्रपतींचे मावळे नाहीत.

गेल्या वेळी एक चूक केली. मी त्यांना उमेदवारी दिली आणि तुम्ही निवडून दिले. त्याबद्दल माफी मागतो. पण आता पुन्हा ती चूक होऊ देणार नाही. गेल्या वेळी निवडून आलेल्यांनी घात केला. छत्रपतींनी मावळे तयार केले. भगवा हा मावळ्याच्या हातात शोभतो, दरोडेखोरांच्या हातात नाही. यांनी दरोडा घालून आपला पक्ष चोरून नेला. ते गद्दार, खोकेबाज, धोकेबाज आहेत. आता ते हरले तरी त्यांनी अनेक पिढ्या खातील एवढे कमावून ठेवले आहे. त्यांनी स्वतःची भरभराट करून घेतली पण जनतेचे हाल होत आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘बुलडाणा हा जिजाऊंचा जिल्हा आहे. आपले सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर सुरतेतही बांधू. हे मंदिर संस्कारपीठ असेल. ते केवळ महाराष्ट्रासाठी नसेल तर जगासाठी आदर्शवत ठरेल.’’ या वेळी जयश्री शेळके यांनी मार्गदर्शन करीत आपले व्हिजन मांडले.

शेतीमालाला भाव नाही

‘‘या महाराष्ट्रात कचरा उचलण्याचा भाव ३५ रुपये किलो आणि सोयाबीन ३० रुपयांनी विकले जात आहे. असे असेल तर या गद्दारांना काय भाव देणार. या निवडणुकीत गद्दारांना घालवा. आता मशाल पेटली आहे. भाजप या चोर, दरोडेखोरांना समवेत घेऊन आमच्या अंगावर येत आहे. पण शिवसेना नसती तर भाजपला कोणीही ओळखले नसते. यांना पाय धरून राज्याबाहेर फेकून द्या,’’ असेही ठाकरे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT