Donald Trump Won US Election : अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार!, कमला हॅरिस पराभूत

Donald Trump Won US Election 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. यामुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या विराजमान राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील.
Donald Trump Won US Election
Donald Trump Won US ElectionAgrowon
Published on
Updated on

Pune News : जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. यामुळे ट्रम्प यांच्याकडे पुन्हा एकदा अमेरिकेच्या चाव्या गेल्या आहेत. जगभरातून ट्रम्प यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावर होत असून असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केलं आहे. तर या निवडणुकीत कमला हॅरिस यांचा पराभव झाला आहे.

जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मंगळवारी (ता.५) संध्याकाळी मतदानाला सुरुवात झाली. तर बुघवारी (ता.६) पहाटे मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २ नंतर या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले. यावेळी ट्रम्प यांनी बहुमताचा २७० चा आकडा पार केला. त्यांच्या पक्षाने २७७ जागा मिळवल्या. यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील.

Donald Trump Won US Election
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर येणार का?

हॅरिस यांना २१४ जागा

दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना कडवी झुंझ दिली. पण याआधी या निवडणुकीत जो बायडेन लढतील असे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने कमला हॅरिस यांना संधी देण्यात आली. हॅरिस यांना २१४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Donald Trump Won US Election
Solapur Assembly Election : सोलापुरातील ९ कारखानदार रिंगणात; गळीत हंगामावर परिणाम, कामगार प्रचार यंत्रणेत गुंतले

ट्रम्प यांचे विजयी भाषण

यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयी भाषणात, समर्थकांचे आभार मानताना हा विजय जनतेचा शानदार विजय असल्याचे म्हटले आहे. तर अमेरिका याआधी कधीच जितकी उत्तम नव्हता तितका बनवणार. सर्व समस्या सोडवायच्या असून आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान सत्ता बनवू शकतो. मी जनतेच्या अपेक्षाभंग करणार नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा

यावेळी मोदींनी एक्सवर पोस्ट करत ट्रम्प यांना शुभेच्छा दिला. मोदींनी आपल्या शुभेच्छात, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना ऐतिहासिक विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मागील कार्यकाळातील यशाच्या आधारे, भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी आपल्या सहकार्यासाठी उत्सुक आहे. आपण आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करू या, असे मोदींनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com